Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मनसेचे आमदार - शून्य, नगरसेवक - शून्य... ठाकरेंसमोर महाराष्ट्राची राजकीय आकडेमोड बदलण्याचे मोठे चॅलेंज

बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राज ठाकरेंनी पुढल्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंनी विजय मिळवला मात्र, आता त्यांची मनसे शून्यावर आहे. 

मनसेचे आमदार - शून्य, नगरसेवक - शून्य...  ठाकरेंसमोर महाराष्ट्राची राजकीय आकडेमोड बदलण्याचे मोठे चॅलेंज

Uddhav Thackeray Raj Thackeray :   5 जुलै 2025 ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी तारीख ठरणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा पहिला ट्रेलर  विजयी मेळाव्यात पहायला मिळणार आहे. 21 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. एकत्र आले तरी ठाकरेंसमोर महाराष्ट्राची राजकीय आकडेमोड बदलण्याचे मोठे चॅलेंज आहे. कारण, आमदार - शून्य, नगरसेवक - शून्य अशा स्थितीत असलेल्या मनसे सोबत शिवसेना आकडांचे गणित कसे सोडवणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. 

9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना झाली.  2009 या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आलेत.  2014 मध्ये जुन्नर विधानसभा मधून शरद सोनवणे एकमेव आमदार विजयी झाले.  2019 मध्ये पुन्हा एकदा एकच आमदार निवडून आला तो म्हणजे राजू पाटील. राजू पाटील कल्याण ग्रामीणचे आमदार. तर, २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा निवडणुक लढवली त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. 2017 साली ठाकरे गटाचे 84 नगरसेवक निवडून आलेत. त्यातील आता 44 नगरसेवकांनी पक्षाला सोडून गेले आहेत, तर मनसेकडे आता एकही नगरसेवक नाही. 

दरम्यान, प्रत्यक्षात निवडणुकीत मनसेला युतीचा नेमका काय प्रस्ताव द्यायचा असा मोठा पेच ठाकरे गटासमोर असणार आहे.  कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या कोंडीत ठाकरे गट अडकणार आहे.  कारण ठाकरे गट आणि मनसेचा काही भागात मतदारांचे समसमान प्राबल्य असल्याने प्रस्ताव नेमका द्यायचा काय असा मोठा प्रश्न ठाकरेंसमोर उपस्थित होणार आहे. 2017 साली ठाकरे गटाचे 84 नगरसेवक निवडून आलेत. त्यातील आता 44 नगरसेवकांनी पक्षाला सोडून गेले आहेत, तर मनसेकडे आता एकही नगरसेवक नाही. त्यामुळे आमची ताकद जास्त असून आमच्या अटी शर्तींवर युती व्हायला हवी अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याची माहिती  सूत्रांनी दिली. 

Read More