Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाकरे बंधू मुंबईत एकत्र येणार पण खळबळ माजणार पुण्याच्या राजकारणात! असं घडणार तरी काय?

ठाकरे बंधू मनोमिलनाच्या राजकीय चर्चांवर   पुण्यातही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. पण प्रत्यक्ष मनपा निवडणुकीत हा उत्साह मतं मिळवण्यात यशस्वी ठरेल का .  या दोन्ही पक्षांची पुणे शहरातली राजकीय ताकद सत्तेत येण्याइतपत आहे का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

ठाकरे बंधू मुंबईत एकत्र येणार पण खळबळ माजणार पुण्याच्या राजकारणात! असं घडणार तरी काय?

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance :  मराठीच्या मुद्यासाठी आयोजित केलेल्या विजयी मेळव्याच्या मंचावर ठाकरे बंधू एकत्र  येत असल्याच्या  पार्श्वभूमीवर मराठी माणूस एकवटल्याचं चित्र राज्यातल्या जिल्ह्यांत शहरांत दिसतंय. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत या बंधु एकत्रीकरणाचा नेमका किती आणि काय परिणाम होईल हे काळ ठरवेल,  पण 2017च्या पुणे मनपात निवडणुकीत शिवसेना आणि मनसे दोघांची बेरीज 12च्याही पुढे जात नाहीये.  यामुळे दोन्ही ठाकरेंच्या  पक्षांची पुणे शहरातली राजकीय ताकद सत्तेत येण्याइतपत आहे का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

मागील काही वर्षांत घडलेल्या पक्षांतरामुळे शिवसेनेच्या 5 नगरसेवक दोन महिन्यांपूर्वी भाजपवासी झाले, तर मनसेचे पुण्यातले फायरब्रँड नेते वसंत मोरे सर्व निवडणुका लढवत व्हाया वंचित सरतेशेवटी ठाकरे सेनेत डेरेदाखल झालेत. त्यामुळे ही बेरीज वजाबाकी केल्यानंतर आजमितीस शेवसेना युबीटीकडे अवघे 4 आणि मनसेकडे साईनाथ बाबरांच्या रुपानं एकच नगरसेवक उरलाय.

सध्या कोणाची ताकद किती 

2017 पुणे मनपा निवडणुकीत शिवसेनेचे 10 नगरसेवक तर मनसेचे 2 निवडून आले. सध्या शिवसेना युबीटीकडे   4 नगरसेवक आणि मनसेचा एक नगरसेवक आहे.  हडपसर, कोथरूड, कसबा, वडगावशेरी इथे आजही दोन्ही पक्षाची ताकद आहे.  कसबा, वडगावशेरी, हडपसर. खडकवासला  शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहतील उबाठाचा दावा आहे.  कोंढवा, कसबा, शिवाजीनगर, खडकवासला आणि कोथरूडमधे राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे.  या दोघांच्या एकञ येण्याने पुणे मनपातलं संख्यात्मक राजकीय चिञ फार काही बदलणार नसलं तरी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये माञ नक्कीच उत्साहाचं भरतं आलंय.

पुणे महापालिकेत सध्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली असली तरी ठाकरे बंधू च्या एकञ येण्याने तळागाळातला मूळचा ठाकरे प्रेमी शिवसैनिक नक्कीच सुखावलाय.  त्यांच्या पक्षांना मिळणारा मराठी मतांचा टक्का नक्कीच वाढेल असं जाणकारांना वाटतंय...
शिवसेना युबीटी आणि मनसे महापालिका निवडणुकीत एकञ लढली तरी  स्वबळाच्या बेंडकुळ्या दाखवणाऱ्या भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी  झुंजवू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल.  

Read More