Thackerays Alliance: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीकडं पहिलं पाऊल टाकलंय. बेस्ट कामगार पतसंस्था निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झालीये. येत्या 18 ऑगस्टला बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची लिटमस टेस्ट होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या अधिकृत घोषणेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ठाकरे बंधूंनी युतीकडं पहिलं पाऊल टाकलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झालीय. ही युती झालीये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत. येत्या 18 ऑगस्टला बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकच पॅनल लढणार आहे.
ही निव़डणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची नांदी मानली जातेय. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेचं बेस्टच्या पतपेढीवर गेल्या नऊ वर्षांपासून सत्ता आहे. बेस्ट पतपेढीत मराठी कामगारांचा मोठा भरणा आहे. त्यामुळं मराठी माणसाचा झेंडा पुन्हा रोवला जाईल असा विश्वास भारतीय कामगार सेनेच्या पदाधिका-यांना आहे.
राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात सैनिकांनी आपसांत वाद घालू नका असा सल्ला दिला होता. महापालिकेवर शंभर टक्के मनसेचीच सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर बेस्टमध्ये झालेली ही युती पहिला शुभशकून मानला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बेस्टमधील या युतीबाबत विचारलं असता त्यांनी राष्ट्रीय विषयावर बोला असं म्हणून कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय.
ठाकरे ब्रँडवर महायुतीच्या नेत्यांनी टीका सुरु केलीय. पण ठाकरे ब्रँड किती दमदार आहे याची चुणूक बेस्टच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी बेस्टची निवडणूक लिटमस टेस्ट मानली जातेय या लिटमस टेस्टचा रिजर्ल्ट काय असेल याची उत्सुकता मराठी माणसाला लागून राहिलीये.
राज ठाकरे शेकापच्या व्यासपीठावर गेले. त्यामुळं आगामी काळात राज ठाकरे शेकापशी युतीसाठी सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा रायगड परिसरात आहे. दुसरीकडं विदर्भातील आक्रमक नेते बच्चू कडूही राज ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बच्चू कडू संभाव्य़ युतीबाबत काहीही बोलले नसले तरीही मनसेनं प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना भेटणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंकडं कोणतीही सत्ता नाही, पद नाही.. तरीही सत्ताधारी असो की विरोधक प्रत्येकाला राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असं वाटू लागलंय. राज ठाकरे आता भाजपसोबत जाणार नाही असं विरोधी पक्षातील नेत्यांना वाटू लागलंय. राज ठाकरे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले नाहीतर शेकाप, प्रहारसारख्या छोट्या पक्षांशी त्या त्या जिल्ह्यात राज ठाकरे युती करतील का? याची उत्सुकता आता निर्माण झालीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी चांगलेच सकारात्मक दिसतायत, राज ठाकरेंनी आजच्या मेळाव्यातून त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.. तसंच युतीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच देखील मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मुबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येऊन राजकीय समीकरणं फिरवणार का? पालिकेवर आपला झेंडा फडकवणार का?, की महायुती वरचढ ठरणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
बेस्ट कामगार पतसंस्थेची निवडणूक 18 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे.
होय, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यात बेस्ट कामगार पतसंस्था निवडणुकीसाठी युती झाली आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसे एक संयुक्त पॅनल घेऊन लढणार आहेत.