Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

21 तारखेला शिवजयंती महाराष्ट्रभर धुमधडाक्यात साजरी करा, राज ठाकरेंचं आवाहन

Shiv jayanti 2022 : राज ठाकरे यांनी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचं आवाहन केलंय.

21 तारखेला शिवजयंती महाराष्ट्रभर धुमधडाक्यात साजरी करा, राज ठाकरेंचं आवाहन

पुणे : राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या वर्धापनदिनानिमित्ता कार्यक्रमाला संबोधित करत असताना शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली आणि विविध विषयांवर टीका ही केली.

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, '21 मार्चला शिवजंयती आहे. आता तारखेने साजरी झाली आणि तिथीने आहे. आपल्या शिव छत्रपतींची जयंती आहे. आपली ओळखच ती आहे. नाहीतर आपली ओळखच काय? आम्ही कोण आहोत. आम्ही सांगतो आम्ही मराठी आहोत. मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून मराठी आहोत. मराठी भाषा बोलणारे कुठे राहतात. तो आमचा राजा जो शिवछत्रपती होऊन गेलेत तेथे आम्ही राहतो.'

'शिवाजी नावाचा विचार जो आहे. त्या भूमीत आम्ही राहतो. तारखेने करावी की तिथीने करावी? 365 दिवस करा. जेव्हा वाटेल तेव्हा करा.' असं ही राज ठाकरे म्हणाले.

'तिथीने का करतो? कारण सगळे सण आपण तिथीने साजरे करतो. प्रत्येक सण तिथीनुसार होतो. राजाचा सण आहे. नुसता जन्मदिवस नाही. सण म्हणून तिथीने साजरा करावी. 21 तारखेला महाराष्ट्रभर शिवजयंती धडाक्यात साजरी करावी. अशी आशा अपेक्षा बाळगतो.' असं राज ठाकरे म्हणाले.

Read More