Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Raj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!

Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.

Raj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!

Raj Thackeray in Ratanagiri: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनवरीवरून (Barsu Refinery) रणकंदन सुरु आहे. या बारसूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्याचं राजकारण पेटल्याचं दिसतंय. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रत्नागिरीत जाहीर सभा घेतली. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे यांची रत्नागिरीत (Ratanagir) प्रथमच सभा होत असल्याने राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना टोले  लगावले आहेत.

काय म्हणाले Raj Thackeray?

अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली. ये तू गप, तू गप.. हा माणूस आत्ताच असं करतोय, तर मी राजीनामा दिल्यावर काय करेल, असं शरद पवारांना वाटलं असेल. मी आधीच सांगितलं काकांकडे लक्ष द्या. तो त्यांचा प्रश्न आहे, आपल्याला देणं घेणं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

तुमच्या पायाखालची जमीन जातीये,  याला तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही गप्प बसता. तुमचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत? मराठ्यांनी अटकेपार जमिनी घेतला आणि तुम्ही जमीन सोडताय? आपण अमराठी लोकांसाठी जमीन विकताय? तुम्हाला याचं भान पाहिजे. मला एकदा येऊन तुमच्याशी बोलायचंचं होतं. ज्या गोष्टी कोकणामध्ये आहेत, त्याच गोष्टींवर केरळमध्ये टुरिझम चालूये, याची किंमत आपल्याला कधी येणार? असा सवाल राज ठाकरे यांनी कोकणवासियांना विचारला आहे.

उद्या कोकणात दुसरी माणसं येतील. बाबांनो जागं रहा... तुमच्या जमिनी कोण घेऊन जाईल याची तुम्हाला कल्पना देखील राहणार नाही. कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतकं वैविध्य असलेलं कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही. 

पाहा LIVE 

दरम्यान, दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. याचं मला खूप वाईट वाटतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय.

Read More