Raj Thackeray on Marathi Bhasha: हिंदी भाषा सक्तीवरुन राज ठाकरे यांनी मीरा रोडच्या जाहीर सभेत भाजप सरकारवर निशाणा साधला. मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचे राज ठाकरे म्हणाले. हिंदुत्वाच्या बुरख्याखाली मराठी संपवलात तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हिंदीला 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अडीच ते 3हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. दर्जा दिल्यास वर्ष झालं पण एक रुपया नाही आलाय. अभिजात भाषेसाठी कमीत कमी 1400 वर्षे असावी लागतात. म्हणजे हिंदीला यासाठी 1200 वर्षे आहेत. ती भाषा तुम्ही आमच्या मुलांना सक्तीची करताय. हिंदीमुळे फक्त सिनेसृष्टीतील कलाकाराचं भलं झालं, अजून कोणाचं झालं? हिंदीने काय भलं केलं तुमचं? या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. यामागचं मला कारणंच नाही कळालं. हिंदी ही या देशात कोणाचीच मातृभाषा नाही. ज्याला कानफाटीत मारलं त्याला विचारा तुझी मातृभाषा कोणती? 200-300 वर्षापुर्वी आलेली भाषा. हिंदीने 250 च्या आसपास भाषा मारल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
दहिसर ते पालघर इथे अमराठी मतदारसंघ बनवायचेत. हळुहळू मुंबईचा संपूर्ण पट्टा गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रांत हिंद प्रांत आहे. महाराजांची इच्छा हिंदुवी स्वराज्य नाही तर हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. माज घेऊन अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच असेही राज ठाकरे म्हणाले.
दुबे बोलला मराठी लोगोंको पटक पटक के मारेंगे झाली का त्याच्यावर केस? असा प्रश्न त्यांनी विचारला. दुबेलाच सांगतो, दुबे मुंबई में आ जाओ मुंबई से समुद्र में डुबे डुबे के मारेंगे, असे म्हणत राज ठाकरेंनी खासदार दुबेंना आव्हान दिलं. आमची सत्ता रस्त्यावरतीचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी यावेळी केला. तुम्ही 56 इंचाची छाती काढुन फिरत असतात. तुम्हाला सांगतो महाराष्ट्र तुमचा बाप आहे. कुणाशी माझी मैत्री असो काहीही असो मराठीबाबत राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही. कोणी म्हणेल ही फडणविसांची स्क्रिप्ट हा कुठला स्क्रिप्ट रायटर? जो स्क्रिप्ट मध्ये स्वतःचा अपमान पण लिहीतो.इथुन पुढे शक्यतो नाही तर मराठीतच बोला, असेही राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करुन बघा. दुकानं नाही शाळाही बंद करीन. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. इतर ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवं. ते सोडून हिंदी सक्ती करताय. कोण दबाव टाकतंय तुमच्यावर. केंद्राचं हे पुर्वीपासून आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून हे सुरु आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव गुजरात्यांचा होता. यासाठी पहिलं विधान वल्लभभाई पटेलांनी केलं. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून पाहत आलो, त्यांनी महाराष्ट्राल विरोध केलाय. गोळीबार करुन महाराष्ट्रात लोकांना ठार मारले होते. गेले अनेक वर्षे होतोय. हे सहज होत नाही. हे चाचपडून बघतायत. हिंदी भाषा आणली की बघू मराठी माणूस जिवंत आहे का. हिंदी ही पहिली पायरी आहे. हळुहळू मुंबई घ्यायची आणि गुजरातला मिळवायची हे यांचं कारस्थान असल्याचे ते म्हणाले.