Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य! जाहीर सभेत पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले

औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद सुरु आहे. औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जाहीर सभेत पहिल्यांदाच राज ठाकरे स्पष्टपणे बोलले.  

 औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य! जाहीर सभेत पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले

Raj Thackeray MNS Gudhi Padwa 2025 :  छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरुन मोठा वाद सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात. विधानसेभतही औरंगजेबच्या कबरीवर चर्चा झाली. मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी प्रथमच जाहीर सभेत औरंगजेबच्या कबरीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुबईच्या  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या  नेमकं काय म्हणाले राज ठाकरे जाणून घेऊया. 

औरंगजेबची कबर आत्ताच का आठवली? चित्रपट पाहून जागे होणारे हे कोणते हिंदू. विकी कौशलला पाहून संभाजीराजे आठवले. अक्षय खन्नाला पाहून औरंजेबची कबर आठवली. संभाजी महाराज, औरंगजेब, औरंजेबाची कबर यावर बोलणाऱ्या वाद घालणाऱ्यांनी आधी इतिहास वाचावा. छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. देशावर केलेला संस्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा संस्कार आहे. हा एक विचार आहे. त्यांच्या जन्माआधी हिंद प्रांताची काय अवस्था होती.

इतिहासावर कोणीही बडबडत आहे विधानसभेत बोलतात. औरंगजेब गुजरात मध्ये जन्मला आला असं सांगत भडकावून दिलं जात आहे. इतिहासाशी काही संबंध नाही. जातीपातीत भांडण लावत आहे माथी भडकवत आहे. 300-400 वर्षाच्या इतिहासावरुन आज जाती पातीवरुन वाद सुरु आहे. 

शिवाजी महाराज यांचे वडील आदिलशाही,निजाम शाहीर गेले त्यावेळची वेगळी परिस्थिती होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट इतिहासात लिहिलेली नाही आज जातीत भांडतो.  औरंगजेब बादशाह याचे राज्य अफगाणिस्थान ते दक्षिण आणि बंगाल पर्यंत होत. शिवाजी महाराज आग्र्याहून आले.औरंगजेबाचा एक मुलगा पळून आला तेव्हा त्याला संभाजी महाराज यांनी आसरा  दिला. नरहर कुरुंदकर लेखक  म्हणाले मराठे लढाई हरत होते पण तरीही औरंगजेब जिंकत नव्हता.  औरंगजेबाला शिवाजीचा विचार मारायचा होता पण त्याला जमलं नाही.

औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. पण, औरंगजेबची सजवलेली कबर आहे तिथे मोठ्या अक्षरात बोर्ड लावा. तिथे मराठ्यांचा इतिहास लिहा. लहान मुलांच्या शाळेच्या सहली इथे घेऊन जा. मुलांना सांग हाच तो औरंगजेब... यानेच हिंदूंची मंदिरे पाडली, यानेच अत्याचार केला... येणाऱ्या पिढीला औरंगजेबचा क्रूर इतिहास सांगा ही औरंगजेबची कबर दाखवा असे राज ठाकरे म्हणाले. 

अफजल खानाची कबर आहे ती शिवाजी महाराजांना विचारून केली असेल औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Read More