Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनेच अवस्थ झाले! कुणाची आणि का धाकधुक वाढली?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे  यांच्या युतीच्या चर्चेनं महायुती सावध झाली आहे. शिवसेनेची धडधड वाढली आहे. तर,  भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनेच अवस्थ झाले! कुणाची आणि का धाकधुक वाढली?

Raj Thackeray  Uddhav Thackeray Alliance :  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनं त्यांच्या त्यांच्या पक्षात चैतन्याचं वातावरण असलं तरी महायुती मात्र कमालीची सावध झालीय. शिवसेनेची धकधक वाढल्याचं त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. तर भाजपनं कुणाचाही युती झाली तरी महायुतीचीच राज्यात सरशी होईल असं वक्तव्य केल आहे. तर भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.   

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युतीच्या चर्चेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकलंय. दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मात्र धडधड वाढली. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याची टीका प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणं चांगलं असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय. पण उद्धव ठाकरेंमुळं राज ठाकरे शिवसेनेतून फुटल्याचा आरोप करायलाही रामदास कदम विसरले नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती करावी की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगत भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. 

कालपर्यंत राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा होती. आता मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या चर्चा सुरु झाल्यात. ठाकरेंच्या बंधूभेटीमुळं किमान मुंबई पुणे आणि नाशिक पट्ट्यात महायुतीला नवी रणनिती आखावी लागणार आहे. त्यामुळं ठाकरेंची युती होते की नाही यावर सर्वाधिक लक्ष महायुतीचं असणार आहे.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आम्ही स्वागत करू.. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचं कारण नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर,  वाट बघ एकत्र आल्यास स्वागत करू असंही फडणवीस म्हणालेत.

Read More