Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...तर महाराष्ट्रात दुकानंच नाही शाळाही बंद करीन, राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

Raj Thackeray on Devendra Fadanvis: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला. 

...तर महाराष्ट्रात दुकानंच नाही शाळाही बंद करीन, राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

Raj Thackeray on Devendra Fadanvis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मदुद्यावरुन मीरा रोडच्या सभेत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. हिंदी भाषा शिकलीच पाहिजे,असं राज्य सरकार म्हणाले. तिसरी सक्तीची भाषा आम्ही करणार म्हणजे करणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता राज्य सरकारला आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. हिंदी आणलात तर  महाराष्ट्रात दुकानंच नाही शाळाही बंद करीन असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला. 

महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करुन बघा. दुकानं नाही शाळाही बंद करीन. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. इतर ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवं. ते सोडून हिंदी सक्ती करताय. कोण दबाव टाकतंय तुमच्यावर. केंद्राचं हे पुर्वीपासून आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून हे सुरु आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव गुजरात्यांचा होता. यासाठी पहिलं विधान वल्लभभाई पटेलांनी केलं. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून पाहत आलो, त्यांनी महाराष्ट्राल विरोध केलाय. गोळीबार करुन महाराष्ट्रात लोकांना ठार मारले होते. गेले अनेक वर्षे होतोय. हे सहज होत नाही. हे चाचपडून बघतायत. हिंदी भाषा आणली की बघू मराठी माणूस जिवंत आहे का. हिंदी ही पहिली पायरी आहे. हळुहळू मुंबई घ्यायची आणि गुजरातला मिळवायची हे यांचं कारस्थान असल्याचे ते म्हणाले. 

हिंदीला 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अडीच ते 3हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. दर्जा दिल्यास वर्ष झालं पण एक रुपया नाही आलाय. अभिजात भाषेसाठी कमीत कमी 1400 वर्षे असावी लागतात. म्हणजे हिंदीला यासाठी 1200 वर्षे आहेत. ती भाषा तुम्ही आमच्या मुलांना सक्तीची करताय. हिंदीमुळे फक्त सिनेसृष्टीतील कलाकाराचं भलं झालं, अजून कोणाचं झालं? हिंदीने काय भलं केलं तुमचं? या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. यामागचं मला कारणंच नाही कळालं. हिंदी ही या देशात कोणाचीच मातृभाषा नाही. ज्याला कानफाटीत मारलं त्याला विचारा तुझी मातृभाषा कोणती? 200-300 वर्षापुर्वी आलेली भाषा. हिंदीने 250 च्या आसपास भाषा मारल्याचेही राज ठाकरे म्हणाले. 

जगातली कोणतीही भाषा वाईट नसते. आमच्यावर लादणार असाल ततर नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवर तर नाहीच नाही. आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे. हिंदुत्वाच्या बुरख्याखाली तुम्ही माझी मराठी संपवत असाल तर माझ्यासारखा कडवट तुम्हाला सापडणार नाही. हे सगळ षढयंत्र समजून घ्या, असे आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केले. 

 

Read More