Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राजापूर नाणार प्रकल्प : गुजरातच्या लँड माफियांसाठीच उद्योग - शिवसेना

गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

राजापूर नाणार प्रकल्प : गुजरातच्या लँड माफियांसाठीच उद्योग - शिवसेना

रत्नागिरी : गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

आशियातील मोठा प्रकल्प 

राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे. 

लँड माफियांचा सुळसुळाट 

या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

कवडीमोलदराने जमिनी

कवडीमोलदराने या जमिनी लँड माफियांनी विकत घेतल्या असून, या जमिनिंना नंतर लाखो रुपये मोबदला मिळू शकतो. आणि त्यांच्यासाठीच हा रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. 

कोकण भकास होईल

गुजरातचे लँड माफिया अब्जाधीश होतील, पण कोकण भकास होईल. त्यामुळे लवकरच या लँड माफियांची यादी नावासहीत यादी जाहीर करु, अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.

Read More
;