Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'राजपूतांना आरक्षण द्या अथवा जातीत विषमता आणणारे संविधान बदला'

ओबीसी आरक्षणाची मागणी देखील जोर धरत 

'राजपूतांना आरक्षण द्या अथवा जातीत विषमता आणणारे संविधान बदला'

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयात आहे. तसेच धनगर, ओबीसी आरक्षणाची मागणी देखील जोर धरत आहे. या पार्श्वभुमीवर राजपूत समाजाने देखील राज्य सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. 

सरसकट राजपूताना आरक्षण दयावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढू असा इशारा राजपूत महामोर्चा प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलाय. 

राजपूत समाजातर्फे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान १९ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येईल असे सेंगर यांनी जाहीर केले. मराठ्यांना आरक्षण दयावे किंवा आरक्षण सिस्टीम रद्द करावी या खासदार उदयनराजे भोसले यांच्या  मागणीचे सेंगर यांनी समर्थन केले,

तसेच देशासाठी इतिहासामध्ये मराठा आणि राजपूत यांनी प्राणाचे बलिदान दिले. या देशाला गुलामीतुन सोडविले. त्यामुळे मराठांसोबत राजपूतांनासुद्धा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. किवा प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मास वेगळे वेगळे कायदे असणारे विषमता प्रधान करणारे सविंधानच बदला असे देखील सेंगर यांनी म्हटले. 

Read More