Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रक्षाबंधनानिमित्त रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, बेस्टच्याही ज्यादा बसेस

 या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि बेस्टने दिलासादायक निर्णय घेतले आहेत. 

रक्षाबंधनानिमित्त रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, बेस्टच्याही ज्यादा बसेस

मुंबई :  रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातोय. त्यात आज रविवारचा दिवस असल्याने भाऊबहिण मोठ्या संख्येत घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि बेस्टने दिलासादायक निर्णय घेतले आहेत. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे . त्यामुळे लोकल प्रवाशांना दिलासा मिळालाय. रक्षाबंधनानिमित्त रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आलायं. यासोबतच बेस्टकडूनही जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. 

प्रवाशांना दिलासा 

भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण देशभर साजरा होणार आहे. लाडक्या भावाला राखी बांधून आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन घेते. त्यामुळे बहिण भावांची लगबग आज दिवसभर पाहायला मिळणार आहे.

मुंबईच्या गर्दीचा या सणाला फटका बसू नसे यासाठी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केलायं. यामुळे प्रवाशांची होणारी तारांबळ वाचणार आहे. 

Read More