Ram Navami 2025 : सर्वत्र वातावरण राममय झालंय असून येत्या रविवारी 6 एप्रिलला राम नवमी साजरी करण्यात येणार आहे. राम भक्त यादिवशी राम जन्मत्सोव साजरा करतात. देशभऱातील राम मंदिरात मोठा उत्साह यादिवशी दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात जुनं आणि प्राचीन राम मंदिराबद्दल सांगणार आहोत. या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा चार महिने सीता आणि लक्ष्मणसोबत राहिले होते.
महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये सर्वात जुनं राम मंदिर आहे. जे निसर्गाच्या सान्निध्यात, तलावाजवळ एका छोट्याशा टेकडीवर वसलंय. या मंदिराच्या टेकड्यांचं विलोभनीय सौंदर्य पाहून पर्यटक आकर्षित होतात. हे रामटेक मंदिर दूरुन एका किल्ल्यासारखं दिसतं. हे मंदिर राजा रघु खोंसले यांनी किल्ला म्हणून बांधले होते. खरं तर या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. महान कवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य देखील या मंदिरात लिहिलं असं पुराणात सांगण्यात आलंय. त्यामुळे या ठिकाणाला रामगिरी असेही म्हणतात, जरी नंतर त्याचे नाव रामटेक पडले.
तसंच प्रभू राम आणि अगस्त्य ऋषी यांची भेट या रामटेक मंदिरात झाली होती. अगस्त्य ऋषींनी भगवान रामाला केवळ शस्त्रास्त्रांचे ज्ञान दिले नाही तर त्यांना ब्रह्मास्त्रही दिले. श्रीरामांना या ठिकाणी सर्वत्र हाडांचे ढीग दिसले तेव्हा त्यांनी अगत्स्याला त्याबद्दल प्रश्न केला. तेव्हा त्यांनी सांगितले की या त्या ऋषींच्या अस्थी होत्या जे येथे पूजा करत असत. यज्ञ आणि पूजा करताना राक्षस अडथळे निर्माण करत असत, ज्याची माहिती मिळाल्यावर श्रीरामांनी त्यांचा नाश करीन असे व्रत घेतले. एवढेच नाही तर ऋषी अगत्स्य यांनी भगवान रामाला येथे रावणाच्या अत्याचाराविषयी सांगितले होते. भगवान रामाने दिलेल्या ब्रह्मास्त्रानेच रावणाचा वध करू शकले.
छोट्या टेकडीवर हे मंदिर असल्याने याला गड मंदिर असंही म्हटलं जातं. त्यासोबत या भागातील लोक सिंदूर गिरी या नावानेही या मंदिराचा उल्लेख करतात. हे राम मदिर जवळपास 400 वर्ष जुनं असल्याच पुराणात उल्लेख आहे. हे मंदिर फक्त दगडांनी बनवलेले आहे, जे एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत. भगवान रामाने माता सीता आणि भगवान लक्ष्मणासोबत वनवासात चार महिने या ठिकाणी घालवले होते. याशिवाय माता सीतेनेही येथे पहिले स्वयंपाकघर बांधले होते, स्वयंपाक केल्यानंतर त्यांनी स्थानिक ऋषींना भोजन दिले. याचे वर्णन पद्मपुराणातही आले आहे.
मंदिराच्या आवारात एक तलाव देखील आहे, त्याबद्दल अशी समजूत आहे की या तलावातील पाणी कधीही कमी किंवा जास्त होणार नाही. लोक आश्चर्यचकित आहेत कारण पाण्याची पातळी नेहमीच सामान्य असते. इतकेच नाही तर असे मानले जाते की जेव्हा जेव्हा वीज पडते तेव्हा मंदिराच्या शिखरावर प्रकाश पडतो, ज्यामध्ये रामाची प्रतिमा दिसते.