Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? रामदास आठवलेंचे एका वाक्यात उत्तर

झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रामदास आठवले यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तर दिली. 

बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? रामदास आठवलेंचे एका वाक्यात उत्तर

Ramdas Athawale Interview To The Point With Kamlesh Sutar : शिवसेना पक्ष फुटला आहे. शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत.  शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. पण,बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? यावरुन होणारा वाद काही संपला नाही.  बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? असा प्रश्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारण्यात आला. आठवले यांनी एका वाक्यात याचे उत्तर दिले आहे. . 'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रामदास आठवले यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली.

 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत  रामदास आठवले यांनी त्यांचा पँथर ते मंत्री असा प्रवास सांगितला. आठवले पँथरच्या चळवळीत कसे आले? दलित पँथरमध्ये फूट का पडली? ढाले-ढसाळांना एकत्र आणण्याचा प्रयत्न का झाला नाही? पँथरच्या फुटीमागे कुणाचा इगो आड आला का? नामांतराच्या लढ्यात आठवलेंचं योगदान.  पँथर-शिवसेनेच्या संघर्षाची कहाणी. आठवले काँग्रेससोबत का गेले होते? पवारांसोबत जाण्याचा निर्णय कसा घेतला? आठवलेंनी संधीसाधूपणाचं राजकारण केलं का? उत्तर प्रदेशात जे घडलं ते महाराष्ट्रात का नाही? रिपब्लिकन ऐक्य टिकलं का नाही? प्रकाश आंबेडकर-रामदास आठवले एकत्र का येत नाहीत? रामदास आठवलेंना मनसेचा राग का? बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? या सर्व प्रश्नांची बिनधास्त उत्तर दिली. 

बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणून उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत.  पण उद्धव ठाकरे हे बाळासहेबांचे कौटुंबिक वारसदार आहेत. पण, एकनाथ शिंदे यांनी 50 पेक्षा जास्त आमदार सोबत आणून हॅट्रीक केली. मुख्यमंत्रीपद भूषवले. एकनाथ शिंदे देखील चांगले काम करत आहेत.  माझा मनसेवर राग नाही. राज ठाकरेंसोबत मतभेद नाहीत. पण, मराठीच्या मुद्द्यावरुन  कोणालाही भाषेची सक्ती करणे योग्य नाही असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

 

Read More