Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'थकलोय पण कुणाला सोडणार नाही,' रामराजे नाईक-निंबाळकरांचा जाहीर इशारा

लोकसभा निवडणुकीपासून रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे असा संघर्ष निर्माण झाला आहे.  

'थकलोय पण कुणाला सोडणार नाही,' रामराजे नाईक-निंबाळकरांचा जाहीर इशारा

फलटण तालुक्यातील राजकीय नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधील एका कार्यक्रमात विरोधकांवर पुन्हा टीका केली. मी थकलोय, पण डोकं चालतंय असं म्हणत त्यांनी विरोधकांना धमकीवजा इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपासून रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे असा संघर्ष निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या संघर्षाला आणखी धार आली आहे. रामराजेंचे भाऊ संजीवराजेंच्या घरावर आयकरचे छापे पडले. रामराजेंची राजकीय आणि आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा फलटण परिसरात सुरु झाली. या छाप्यानंतर सुरुवात तुम्ही केली होती. शेवट आम्ही करणार असं रामराजेंनी स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसवर जयकुमार गोरेंनीही पलटवार केला होता. सुरुवात तुम्ही केली पण नियतीनं तुमचाच शेवट केल्याचा टोला जयकुमार गोरेंनी लगावला होता.

जयकुमार गोरेंच्या या टीकेला आता रामराजेंनी उत्तर दिलं आहे. आपण थकलो नाही डोकं चालतंय तोपर्यंत काळजी नको. विरोधकांना खुर्चीन बसून संपवेन असा इशाराच रामराजेंनी दिला आहे. महायुतीत असलेल्या या तिन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच विस्तव जात नव्हता.

- लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजेंनी विरोध केला
 
- लोकसभेला रामराजेंच्या कुटुबियांनी रणजितसिंहांविरोधात प्रचार केला

- विधानसभेला रामराजेंमुळं उमेदवारी जाहीर करुनही दीपक चव्हाणांनी उमेदवारी स्वीकारली नाही

- संजीवराजे आणि दीपक चव्हाणांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला

निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं देऊन मंत्री करण्यात आलं. त्यामुळं रामराजे विरुद्ध जयकुमार आणि रणजितसिंह असा संघर्ष खूपच तीव्र झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा संघर्ष रस्त्यावरही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More