Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रंगपंचमीला जावयाची गाढवावरून वरात! या गावात अजब परंपरा

...म्हणून रंगपंचमीला जावयाची गाढवावरून काढली जाते वरात

रंगपंचमीला जावयाची गाढवावरून वरात! या गावात अजब परंपरा

मुंबई : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दशकांपासून रंगपंचमी म्हणजे धुळवड साजरी करण्याची एक अनोखी परंपरा आहे. या परंपरेनुसार 'निवडलेल्या जावयाला' गाढवावर बसून सैर केली जाते. यानंतर जावयाला सोन्याची अंगठी आणि कपडे देऊन त्याचं औक्षण केलं जातं. मात्र यंदा कोरोनाचा धोका असल्यामुळे गावात या अनोख्या परंपरेचं आयोजन करण्यात आलेलं नाही. 

ही परंपरा बीडच्या केज तहसीलच्या विडा येवता गावांत जवळपासून गेल्या 80 वर्षांपासून सुरू आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जावयाला गाढवावर बसून एक चक्कर मारली जाते. त्यानंतर त्यांना आवडीचे कपडे देऊन त्यांचं कौतुक केलं जातं. गाढवावरून जावयाची मिरवणूक पाहण्यासाठी जवळपासच्या गावातील अनेक गावकरी येतात. ही मिरवणूक सकाळी 11 वाजता गावातील मंदिरात संपते. 

यानंतर सासरे जावयाचं तोंड गोड करतात. सोन्याची अंगठी भेट देतात. आणि नवीन कपड्यांनी कौतुक करतात. मात्र यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे या परंपरेवर बंदी आणण्यात आली आहे. होळीच्या दिवशी महाराष्ट्रात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. 

fallbacks

कशी सुरू झाली ही परंपरा 

गावात राहणाऱ्या सुमित सिंह देशमुख यांनी सांगितलं की, त्यांचे पंजोबा अनंतराव देशमुख यांच्या आठ दशकांअगोदर ही परंपरा सुरू झाली. सुमित सिंह यांच्या म्हणण्यानुसार, खापर पंजोबांचे जावई रंगपंचमी खेळण्यास नकार देत होते. तेव्हा खापर पंजोबांनी गावकऱ्यांच्या मदतीने गाढवाची सोय केली. गाढवाला फुलांची माळा घालून जावयाची जवळपास तीन तास गावात बँडसह मिरवणूक काढली. त्यानंतर गावातील मंदिरात जावयाचं कौतुक केलं. त्याला अंगठी आणि कपडे भेट दिली. त्यानंतर गावात रंगपंचमीचा एक उल्लास पाहायला मिळाला. त्यानंतर ही परंपरा सुरूच झाली. 

fallbacks

अशी होते जावयाची निवड 

गावात आतापर्यंत 180 जावई आहेत जे याच गावात स्थिरावले आहेत. येथे काम-धंदा करतात. जवळपास 11 हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावात जावयांना होळीच्या काही दिवस आधीच शॉर्टलिस्ट केले जातात. अगोदर 10 जावयांची यादी तयार करून त्यामधून एकाची निवड केली जाते. काही जावयांची निवड झाल्यावर ते असं करण्यास नकरा देतात. त्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी त्यांना समजावतात. कधी तर रंगपंचमीच्या अगोदर अनेक जावई गाव सोडून जातात. मात्र त्यांना खास गाडी करून गावात आणलं जातं. 

Read More