Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचा खून

चौथ्या दिवशी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एका निर्जन स्थळी आढळला.

महाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचा खून

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरजवळ खांझमानगर इथे राहणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय. ही मुलगी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात 17 एप्रिल रोजी आई आणि वडिलांसोबत आली होती. आई वडील जेवण करून घरी आले मात्र मुलगी परतली नाही अखेर दुसऱ्या दिवशी पथ्रोट पोलीस स्टेशनमध्ये मुलगी हरविल्याची तक्रारही दिली. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही.

चौथ्या दिवशी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एका निर्जन स्थळी आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अज्ञात आरोपीविरुद्ध 302 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Read More