Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक अत्याचार करत बनवली ब्लू फिल्म

नागपुरातील संतापजनक घटना

धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक अत्याचार करत बनवली ब्लू फिल्म

नागपूर : विवाहितेवर सामूहिक अत्याचार करून त्याची ब्लू फिल्म तयार केल्याची संतापजनक घटना नागपुरात उघड झाली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी छोटेबाबा उर्फ शहनशहा शेख आणि बंटी श्रीवास या दोन आरोपींना अटक केली आहे. पीडित विवाहितेचा पती हा मुख्य आरोपी शहनशाहचा मित्र आहे. पीडितेचा जानेवारी 2018 ला प्रेमविवाह झाला. पीडितेच्या पतीला दारूचं व्यसन आहे. ऑक्टोबर महिन्यात एक रात्री छोटेबाबा  तिच्या घरी आला. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक युवक होता. तिचा पती मद्यधुंद होता. संधी साधून छोटेबाबाने तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अश्लील चित्रफीत काढली. 

ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत छोटेबाबाच्या साथीदारानेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी छोटेबाबासोबत आलेल्या अन्य दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. अखेर छोटेबाबाकडून होत असलेला अत्याचार असह्य झाल्यानं पीडितानं याप्रकरणी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Read More