Rare White Leopard Cub: बिबट्या म्हटलं की नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण असतं. बिबट्या धुमाकूळ घालतो, गाय, कुत्र्यांवर हल्ला करतो, असं चित्र असतं. पण वन्यप्रेमी बिबट्याच्या भावविश्वाशी परिचित असतात. त्याची हालचाल, स्वभाव प्रत्येक गोष्टींबद्दल त्यांना उत्सुकता असते. तुम्हीदेखील बिबट्याबद्दल उत्सूक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
बिबट्याचा रंग त्याच्या अधिवासावर आणि उपप्रजातींवर अवलंबून असतो. सामान्यतः, बिबट्याच्या शरीरावर पिवळसर किंवा हलका पिवळा रंगाचा पडतो, ज्यावर गडद रंगाचे रोझेट्स (गुलाबासारखे ठिपके) असतात. काही बिबट्यांमध्ये, रंग गडद लालसर-नारंगी किंवा अगदी काळाही असू शकतो, याबद्दल आपल्याला माहिती असेलच. पण रत्नागिरीत आढळलेला बिबट्या थोडा खास होता. कारण त्याचा रंग रत्नागिरीत सहसा आढळणाऱ्या बिबट्यांपेक्षा वेगळा होता. म्हणजेच पांढरा होता. अशा रंगाचा बिबट्या बर्फाळ प्रदेशात आढळतो. असे असले तरी रत्नागिरीत आढळलेला हा बिबट्या स्नो लेपर्ड नव्हता. रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू आढळून आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा रंगाचं पिल्लू असल्याने वन्यप्रेमींच्या मनात उत्सुकता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावत बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं दिसली. त्यातील एक पिल्लू पांढऱ्या रंगाचे होते. यानंतर दुर्मिळ बिबट्यासंदर्भात मजूरांनी वनविभागाला कळवले.
पांढऱ्या रंगाचा बिबट्या बर्फाळ प्रदेशात आढळतो. त्याला स्नो लेपर्ड म्हणतात. रत्नागिरीत आढळलेला बिबट्या पांढऱ्या रंगाचा असला तरी तो स्नो लेपर्ड नाही. रत्नागिरीत आढळलेला बिबट्या दुर्मिळ आहे. मॅलेनिन नावाच्या रंगद्रव्यावरुन प्राण्यांच्या शरीरातील रंग ठरत असतो. शरीरातील मॅलेनिनचे प्रमाण कमी झाल्याने पांढरा रंग येऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरीत आढळलेलं बिबट्याचं पिल्लू पांढऱ्या रंगाच असल्याचं म्हटलं जातंय.
रत्नागिरीत बिबट्याचं दुर्मिळ पिल्लू आढळल्यानं स्नो लेपर्डविषयी चर्चा होऊ लागली. रत्नागिरीत आढळलेल्या बिबट्याशी याचा संबंध नाही. पण मग स्नो लेपर्ड कसा असतो? त्याचा आधिवास कसा असतो? यानिमत्ताने स्नो लेपर्डबद्दल जाणून घेऊया. हिमालयीन संस्कृतीत स्नो लेपर्डला पवित्र आणि रहस्यमय प्राणी मानले जाते. स्थानिक लोककथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. पांढरा बिबट्या स्नो लेपर्ड (Snow Leopard) असेही म्हणतात, हा हिमालयासारख्या उंच पर्वतीय भागात आढळणारा एक दुर्मीळ आणि सुंदर प्राणी आहे. त्याचा वैज्ञानिक नाव Panthera uncia आहे. याचा फर पांढरा किंवा राखाडी-क्रीम रंगाचा असतो. ज्यावर काळे ठिपके असतात. हा फर त्याला बर्फात लपण्यास मदत करतो. हिमालय, तिबेट, मंगोलिया, आणि मध्य आशियाच्या उंच पर्वतांमध्ये 3,000 ते 5,500 मीटर उंचीवर हा बिबट्या आढळतो.या बिबट्याची लांबी साधारण 1.8 ते 2.3 मीटर (शेपटीसह) असते. याचे वजन 25 ते 75 किलो पर्यंत असते. हा बिबट्या मांसाहारी असतो. प्रामुख्याने निळ्या मेंढ्या (भरल), आयबेक्स, हरण, आणि लहान प्राणी हे त्याचे भक्षक असतो. स्नो लेपर्डना एकटे राहायला आवडते. ते उत्कृष्ट चढाई करतो. तसेच रात्री किंवा पहाटे जास्त सक्रिय असतो.स्नो लेपर्डची सध्याची संख्या अंदाजे 4 हजार ते 6 हजार 500 इतकी आहे. सध्या यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसतेय. अधिवास नष्ट होणे, अवैध शिकार, आणि मानव-प्राणी संघर्ष हे स्नो लेपर्ड कमी होण्याचे मुख्य कारण आहे. असे असले कतरी WWF आणि स्नो लेपर्ड ट्रस्टसारख्या संस्था त्यांच्या संरक्षणासाठी काम करतात.