Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले

 खेड आणि चिपळूण जवळील लोटे परशूराम एमआयडीसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची बोट उलटली. 

रत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले

रत्नागिरी : खेड आणि चिपळूण जवळील लोटे परशूराम एमआयडीसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची बोट उलटली. खेडच्या कोतवाली खाडीपात्रात हा अपघात झाला. आंदोलन करणाऱ्यांची बोट बुडाल्याने आंदोलनकर्ते बुडालेत.  

खेडमधल्या कोतवाली इथे खाडी पात्रात बोट बुडाली. उपोषणकर्त्यांना घेऊन जाणारी ही बोट खाडी पात्रात उलटली. पण सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

ग्रामस्थांचं दर्यासारंग मच्छिमार भोई समाज उत्कर्ष मंडळासह दूषित पाण्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यापैकीच आठ जण बोटीत प्रवास करत होते. सुदैवानं सगळ्यांना वाचवण्यात यश आलंय.

Read More