Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रत्नागिरीतल्या चिमुकलीचा गोव्यात नरबळी? शेजाऱ्याच्या घराबाहेर गाडलेला मृतदेह, घटनाक्रम हादरवणारा

Ratnagiri Goa crime news : हत्या की नरबळी? पोलिसांनी सुरू केला या प्रकरणातील पुढचा तपास. घटनाक्रम अंगावर भीतीनं काटा आणणारा... 

रत्नागिरीतल्या चिमुकलीचा गोव्यात नरबळी? शेजाऱ्याच्या घराबाहेर गाडलेला मृतदेह, घटनाक्रम हादरवणारा

Ratnagiri Goa crime news : पाच वर्षांच्या लहान मुलीच्या हत्या आणि कथित स्वरुपातील हत्येनं रत्नागिरी आणि गोवा हादरलं आहे. पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करणारा धक्कादायक प्रकार गोव्यात घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार या बेपत्ता 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

गोव्यातील कसलये-तिस्क फोंडा इथं हा धक्कादायक प्रकार घडला. अमेरा ज्युडान अन्वारी (वय 5) असं मयत मुलीचं नाव. ज्या घराशेजारी हा मृतदेह गाडलेल्या स्थितीत होता. त्या घराच्या मालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, ज्यानंतर या चौकशीदरम्यान घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट पती-पत्नीने कबूल केलं हा गुन्हा कबूल करताच संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट व त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. घडला संपूर्ण प्रकार पाहता नागरिकांनी भावना व्यक्त केल्या असून हा जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकालाही पोलिसांनी ताब्यात घ्यावी अशी मागणी  केली जात आहे. दरम्यान, चिमुकलीचा खून करण्यात आला की नरबळी याचे गूढ अद्याप कायम असून पोलीस तपास करत आहेत. 

घटनाक्रम अंगावर काटा आणणारा 

पोलिसांनी प्राथमिक तपासातून दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट कुटुंबीय परप्रांतीय असून मागील अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दाम्पत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे मूलबाळ होण्याबरोबरच समृद्धी मिळावी, या हेतूनेच हा ''नरबळी'' दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. अमेरा बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या हा कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली होती. 

त्यानंतर फोंडा पोलीस स्थानकात अमेराच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. फोंडा पोलिसांनी तपासाला वेग देताना वस्तीत घरोघरी सखोल चौकशीला प्रारंभ केला. बाबासाहेब याच्याकडे बुधवारी चौकशी केली असता तो थोडा गडबडला होता. गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली असता तो असंबंधित उत्तर देऊ लागला आणि तिथंच तो फसला.

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला असून, पुढील चौकशी सुरू आहे.  हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. कसलये-तिस्क येथील अमेरा अन्वारी ही चिमुरडी सकाळपासून बेपत्ता होती. यासंबंधी फोंडा पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, ही मुलगी आपल्या आईसमवेत राहत असलेल्या घरासमोरील सुमारे 50 मीटर अंतरावरील अलाट कुटुंबियाच्या घरी ये-जा करीत होती म्हणून पोलिसांनी अलाट पती-पत्नीकडे पोलिसांनी चौकशी केली असता झाला प्रकार उघडकीस आला. घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट पती-पत्नीने कबूल केलं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Breaking News Live Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर  

अमेरा अन्वारी ही आपल्या आई आणि एका भावंडासह कसलये येथे राहत होती. अमेराची आईला लग्न करून रत्नागिरीला दिले होते. पण नवरा मारझोड करीत असल्याने ती दोन्ही मुलांसमवेत कसलये येथे आपल्या आईच्या घरी वर्षभरापूर्वी रहायला आली होती.

मुलबाळ होत नव्हतं, म्हणून...

बाबासाहेब हा एक उत्कृष्ट वेल्डर आहे. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला वीस वर्षे उलटली तरी या दांपत्याला मुलबाळ होत नव्हतं. त्यामुळे त्याने जादू टोण्याने मूल व्हावं, समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केलं असावं असाही कयास लावला जात आहे. 

Read More