Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News : स्वप्नाली सावंत जळीतकांडप्रकरणी आणखी एक हादरवणारी माहिती समोर, 18- 20 गोणी...

त्या 31 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहितीच समोर आली 

Crime News : स्वप्नाली सावंत जळीतकांडप्रकरणी आणखी एक हादरवणारी माहिती समोर, 18- 20 गोणी...

Ratnagiri Swapnali Sawant : काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत झालेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला, रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत 31 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती हादरवून गेली. (Crime News)

स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) यांची जाळून हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. राजकीय नेते सुकांत (भाई) सावंत असं आरोपीचं नाव असून त्याने स्वप्नाली सावंत यांना पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याचं तपासातून समोर आलं. प्रकरण धक्कादायक ठरलं, कारण सावंत यांना जाळल्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची राख समुद्रात टाकण्यात आली. Ratnagiri Crime swapnali sawant murder case shocking updates 

सदर घटनेसंदर्भातील आणखी एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. त्यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजत होता, असं पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीतून समजत आहे. 

गणपतीनिमित्त गावी गेल्या त्या परत आल्याच नाहीत... 
गणेशोत्सवानिमित्त गावी गेलं असता स्वप्नाली यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. पुढे मृतदेह लपवला. तपासात दिशाभूल होण्यासाठी गुन्हेगारानं तरबेजपणे त्यांचा मोबाईल गेत रत्नागिरी (Ratnagiri) ते लांजा (Lanja) प्रवास केला. गुन्हा झाला त्याच सायंकाळी स्वप्नाली यांचा मृतदेह घराच्याच आवारात पेट्रोल आणि पेंढा टाकून जाळण्यात आला. 

पायाखालची जमीन हादरवणारं कृत्य पुढेही घडलं. पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून जवळपास 18 ते 20 गोण्या भरून राख समुद्रात टाकण्यात आली. पण, चूक झालीच. फॉरोन्सिक विभागाला सदर घटनेचा तपास करताना मृतदेहाचे काही अवशेष सापडले जे सध्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर हाती येणारा अहवाल बरीच माहिती समोर आणेल असं सांगण्यात येत आहे. 

वाचा : फरफटतं नेलं...बेदम मारलं...झाडावर टांगलं; 2 मुलींविषयी सांगताना आईचा टाहो

स्वप्नाली यांची हत्या का करण्यात आली? 
स्वप्नाली सावंत आणि पती सुकांत सावंत यांच्यात वाद होते. वाद विकोपास गेला तेव्हा सदरील तक्रारही करण्यात. प्राथमिक अंदाज पाहता कौटुंबीक कलहातून हत्या झाल्याचं कळत आहे. 

Read More