Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा

Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.   

रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : आणखी एका धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला असून, रत्नागिरीतील या घटनेनं अनेकांचाच थरकाप उडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात अनैतिक संबंधातून घडलेल्या एका खळबळजनक घटनेने परिसरात हाहाकार माजवला आहे. (Ratnagiri News)

प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी मृताची पत्नी नेहा निलेश बाक्कर (वय 32) आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर (वय 35) यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

जबाबात तफावत आढळताच पोलिसांना गुन्हेगार सापडला... 

गिम्हवणे गावात सलून व्यवसाय करणारे निलेश बाक्कर सोमवारी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने दापोली पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी नेहा बाक्करकडे चौकशी केली असता, तिच्या जबाबात तफावत आढळून आल्याने तिच्यावर संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. 

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेहाच्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ती प्रियकर मंगेश चिंचघरकरसोबत दिसून आली. याचदरम्यान, एका बियर शॉपमध्ये नेहाने बियर खरेदी केल्याचेही फुटेजमध्ये आढळले. पुढील तपासात, तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून त्याचा खून केला असल्याचे उघड झाले. 

हेसुद्धा वाचा : सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट; हल्लेखोर अन् मोलकरीण दोघंही...; तितक्यात आला सैफ अन् झाला हल्ला

खून केल्यानंतर पत्नी नेहाने प्रियकर मंगेशच्या मदतीने पती निलेश यांचा मृतदेह पालगड पाटील वाडी परिसरातील विहिरीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी या मृतदेहाचा शोध घेवून तो दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मंगेश चिंचघरकर हा मंडणगड डेपोत बस चालक असून, त्याला दापोलीत सापळा रचून अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश यांनी हा कट रचला होता. या प्रकरणातील कटात अन्य कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्यानंतर नेमके काय झाले, याबाबतचा तपास सुरू आहे. ही घटना स्थानिकांसाठी धक्कादायक असून पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. 

Read More