Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कुख्यात रवि पुजारीवर बिल्डरला खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

राजू पुजारीच्या नावाने फोन करणाऱ्या व्यक्तिने पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कुख्यात रवि पुजारीवर बिल्डरला खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

ठाणे : कुख्यात रवि पुजारीने खंडणी मागण्यासाठी फोन केल्याची तक्रार एका बिल्डरने पोलिसांत केली आहे. हा बिल्डर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा उपनगरातील असून, त्याने रवि पुजारीने खंडणी मागितल्याचा आणि जबरदस्तीने वसूली केल्याचा आरोप केला आहे. या बिल्डरने मुंब्रा पोलिस स्थानकामध्ये मंगळवारी तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच, हे प्रकरण जानेवारी महिन्यातील असून, एका व्यक्तिने खंडणीसाठी अनेक वेळ फोन केल्याचे बिल्डरने म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बिल्डरला फोन करणारा व्यक्ती हा स्वत: राजू पुजारी बोलत असल्याचे सांगत खंडणीपोटी दोन कोटी रूपये देण्यासाठी दबाव टाकतो. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, तक्रारदार बिल्डरचा एक प्रसिस्पर्धी बिल्डर त्याला संपविण्यासाटी आणि एका वादग्रस्त भूप्रकल्पातून त्याला बाजूला काढण्यासाठी पुजारीला तीन कोटी रूपये द्यायला तयार आहे.

दरम्यान, राजू पुजारीच्या नावाने फोन करणाऱ्या व्यक्तिने पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Read More