Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!

नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय. 

२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!

पुणे : नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय. 

यामुळे पुणे जिल्हा बॅंकेची काहीही चूक नसताना बॅंकेला हा नाहक भुर्दंड पडणार असल्याचा दावा पुणे जिल्हा बॅंकेनं केला आहे. 

आपल्याकडे जमा झालेली रक्कम ठेवण्यासाठी जागा नसल्याचं कारण देत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी या नोटा स्वीकाराल्या नसल्याचं पुणे जिल्हा बँकेनं सांगितलंय. 

Read More