Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महायुतीला बंडखोरीचं ग्रहण, ५४ ठिकाणी बंडखोरी

महायुतीला फटका बसण्याची शक्यता

महायुतीला बंडखोरीचं ग्रहण, ५४ ठिकाणी बंडखोरी

मुंबई : शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्याचबरोबर आयात उमेदवारांना तिकीट मिळाल्यामुळे पक्षातील नाराजी समोर आली. त्यामुळे अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काहींची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश आलं. मात्र ५४ जागांवर बंडखोरांचं मन वळविण्यात शिवसेना-भाजपला अपयश आलं. त्यामुळे या ५४ जागांवर युतीला फटका आणि आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. बंडखोरीमध्ये मुंबईतल्या तीन जागांचा समावेश आहे. मराठवाडा, पुणे, कोकण, सोलापूर आणि नाशिकमधून बंडखोरांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.

महायुतीत बंडखोरी

डॉ. मधू मानवतकर - भाजप - भुसावळ
अनिल चौधरी - भाजप - रावेर
अमोल शिंदे - भाजप - पाचोरा
संतोष ढवळे - शिवसेना - यवतमाळ
संजय देशमुख - भाजप - दिग्रस
राजू तोडसाम - भाजप - आर्णी
संतोष ढवळे - शिवसेना - यवतमाळ
सीमा सावळे - भाजप - दर्यापूर
राजू बकाणे - भाजप - वर्धा
आशिष जैस्वाल - शिवसेना - रामटेक
चरण वाघमारे - भाजप - तुमसर
विनोद अग्रॅवाल - भाजप - गोंदिया
संतोष जनाटे - भाजप - बोईसर
नरेंद्र पवार - भाजप - कल्याण पश्चिम
धनंजय बोडारे - शिवसेना - कल्याण पूर्व
अतुल देशमुख - भाजप - खेड आळंदी
राहुल कलाटे - शिवसेना - चिंचवड
विशाल धनावडे - शिवसेना - कसबा
नारायण पाटील - शिवसेना - करमाळा
महेश कोठे - शिवसेना - सोलापूर मध्य
मनोज घोरपडे - भाजप - कराड उत्तर
राजन तेली - भाजप - सावंतवाडी
रणजीत देसाई - भाजप-स्वाभिमान पुरस्कृत - कुडाळ
निशिकांत पाटील - भाजप - इस्लामपूर
सम्राट महाडिक - भाजप - शिराळा
डॉ. रवींद्र आरळी - भाजप - जत
राजुल पटेल - शिवसेना - वर्सोवा
तृप्ती सावंत - शिवसेना - वांद्र पूर्व
मुरजी पटेल - भाजप - अंधेरी पूर्व

Read More