Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशिकमध्ये अनेकांचा बंडाचा झेंडा, युतीत बिघाडी

 भाजप सेनेची युती झाली असली तरी अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर युती बिघाडी कायम आहे. 

नाशिकमध्ये अनेकांचा बंडाचा झेंडा, युतीत बिघाडी

किरण ताजणे, नाशिक : राज्यात जरी भाजप सेनेची युती झाली असली तरी अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर युती बिघाडी कायम आहे. अनेकांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराच्या विरोधात सेनेच्या उमेदवाराने बंड पुकारलंय. तर नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांनी बंड पुकारलंय. त्यामुळे वरीष्ठ नेत्यांनी जरी जुळवाजुळव केली असली तरी स्थानिक पातळीवरमात्र युतीतील संघर्ष कायम आहे.

राज्यात भाजप सेनेत मिले सूर तेरा तुम्हारा तो सूर बने हमरा.. असं असलं तरी राज्यातील विविध ठिकाणी सेनेत आणि भाजप मध्ये संघर्ष कायम आहे. निवडणुकीत अनेक ठिकाणी युतीच्या पक्षांनी तडजोड केली असली तरी राज्यात स्थानिक पातळीवर भाजप सेनेचे उमेदवारी एक पाऊल माघे यायला तयार नाही. नाशिक पश्चिमची जागा भाजपलाच गेल्यानं सेनेच्या नगरसेवकानी बंड पुकारलंय. विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच भाजपने ही उमेदवारी दिल्यानं सेनेच्या बंडखोर नगरसेवकांनी विलास शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिंदेंनी मात्र यावेळी भाजपनं या मतदार संघात घुसखोरी केली असून पाच वर्षात काम केली नसल्याचा दावा सेना स्टाईलने विजय आपलाच असल्याचा दावा केलाय.

शिवसेनेच्या उमेदवारांने घेतलेल्या या भूमिकेवर भाजपने या मतदारसंघात आमचच वर्चस्व असल्याचं सांगत पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांकडे यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे भाजपच्या उमेदवारी भूमिका घेतली आहे. नाशिक पश्चिमप्रमाणे नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदार संघात युतीची जागा शिवसेनेलाच गेली आहे. तेथे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात भाजपचे रत्नाकर पवार यांनी उमेदवारी दाखल करत बंडाचा झेंडा हाती घेतलाय.

वरिष्ठ नेत्यांनी सत्ता समीकरण बघता युतीची घोषणा करत येणाऱ्या विधानसभेला सामोरे जात आहे. त्यातच स्थानिक पातळीवरील स्थानिक नेत्यांची बंडखोरीची भूमिका पक्षश्रेष्ठींना डोकेदुखी ठरत आहे. असं असलं तरी बंडखोरीवर नेत्यांची भुमिकाही सावध असल्यानं बंडखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या बंडखोरांवर कारवाई होणार की त्यांना नेहमीप्रमाणे पाठशी घातलं जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Read More