Registered marriages in Maharashtra: कुटुंब आणि समाजाला होणारा विरोध जुगारून आता आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या वर्षभरात 1937 विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत. यावर्षी ही संख्या 467 ने वाढलेली दिसून येत आहे. एकीकडे धुमधडाक्यात दिमागदार लग्नसोळे करण्यासाठी कुटुंब इच्छुक असताना तरुणाई कडून आवाजही खर्चाला फाटा देण्याचे काम केले जात आहे. या माध्यमातून होणारी आर्थिक बचत नवदांपत्यांना आपआपल्या संसारासाठी उपयुक्त ठरत आहे. धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात घटस्फोट होत असल्याने लग्नातला केलेल्या खर्च वाया जातो.परिणामी नोंदणी पद्धतीने विवाह करताना विधिवत प्रमाणपत्र मिळते हे विशेष.त्यामुळे तरुणाई सध्या याकडे अधिक उत्सुक असल्याचा दिसून येत आहे.
विशेष बाब म्हणजे यात तरुणींनी देखील आपलं मत विशेष व्यक्त केला आहे अनेक वेळेस आई-वडिलांकडे लग्न करण्यासाठी पैसे नसतात आणि जगासमोर आपल्या मुलीची इज्जत राखण्यासाठी मोठ्या थाटामाटात लग्न करतात यामुळे अनेक मुलींनी असा निर्णय घेतला आहे की लग्न हे साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत करावे. यामुळे आई-वडिलांना कर्जही घ्यावे लागत नाही आणि कमी पैशांमध्ये संपूर्ण लग्न होतं.आणि जो पैसा लग्नासाठी लागणार असतो तो भविष्यात लग्न संसाराला किंवा अन्य गोष्टींमध्ये वापरायला मिळतो. यामुळे लग्नाचा गाजावाजा करण्यापेक्षा कोर्ट मॅरेज करून लग्न केलेलं कधीही उत्तम अशी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत पालकांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीये. आपल्या मुला मुलींची लग्न मोठं व्हावं अशा प्रत्येक पालकाची अपेक्षा असते यासाठी अनेक पालक कर्ज देखील काढतात. मात्र हा खर्च थोडाफार नसतो तर तब्बल दहा ते पंधरा लाख रुपये लग्नाला निघून जातात. पण मुलांनी असा निर्णय घेऊन उत्तमच केला असल्याचं पालकांनी आपली भावना व्यक्त केली आहे.मुला मुलींची लग्न होणे ही आनंदाची गोष्ट असते मात्र कधीकधी हे लग्न कर्ज काढून करावा लागतं लग्न टिकलं तर आनंदच पण भविष्यात मुला मुलींमध्ये होणारे वाद-विवाद यामुळे मुलं मुली विभक्त होतात आणि हा केलेला खर्च संपूर्ण पाण्यात जातो. यामुळे आत्ताच्या पिढीने जो निर्णय घेतला आहे तो चांगलाच असल्याचं पालक म्हणत आहे.
पहिल्या वेळेस आई-वडील जे सांगतात ते आम्हाला करावे लागायचं मात्र आत्ताची पिढी हुशार झाली आहे.स्वावलंबी झाली आहे. स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे शिक्षित झाली आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे.त्यामुळे ते जे निर्णय घेताय ते योग्यच असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या काळामध्ये लग्न म्हंटलं की धुमधडाक्यात झालं पाहिजे असा म्हणणारा काळ आता बदलत चाललाय. नवीन पिढी आता बदलायला लागलीये...." लग्न खर्च नको रे बाबा". असं म्हणत तरुण मुलं मुली लग्नासाठी विवाह नोंदणी कडे म्हणजेच कोर्ट मॅरेज कडे वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. उलट लग्नात होणारा खर्च हा सेविंग करून कुटुंबासाठी उपयोगात पडेल अशी भावना व्यक्त करत आहे... म्हणून आत्ताची पिढी हुशार नाही तर स्मार्ट होत चालली आहे असं म्हणायला हरकत नाही.