Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आता भाडेकरूंचं मोठं टेन्शन मिटणार, पोलीस स्टेशनच्या खेपा वाचणार, वाचा कसं

घर भाडे करारावर घेताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो पोलीस व्हेरिफिकेशनचा, पण आता... 

आता भाडेकरूंचं मोठं टेन्शन मिटणार, पोलीस स्टेशनच्या खेपा वाचणार, वाचा कसं

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : घर भाड्यानं घेताना पोलीस स्टेशनला जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं. मात्र आता भाडेकरूंची ही कटकट कायमची मिटणार आहे. आता ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय मुद्रांक शुल्क विभागानं घेतलाय. 

त्यानुसार भाडेकरार नोंदवताना ई रजिस्ट्रेशन पोर्टलमार्फत माहिती संबंधित पोलीस ठाण्याला पाठवली जाते. आता त्या माहितीची पडताळणी पोलिसांमार्फत केली जाईल. त्यामुळे भाडेकरूंना आता पोलीस स्टेशनला जाण्याची गरज उरणार नाही. यासाठी राज्यातील 1 हजार 1130 पोलीस स्टेशन पोर्टलशी जोडण्यात आले आहेत. 

राज्यात दरमहा सुमारे 85 हजार भाडेकरार होतात. सध्या पुणे महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर येत्या 3 ते 5 महिन्यांमध्ये राज्याच्या गावागावात ही सुविधा पोहोचलेली असेल. 

घरबसल्या नोंदणी करण्याची सुविधा देत मुद्रांक शुल्क कार्यालयाच्या खेपा तर वाचल्याच पण आता पोलीस स्टेशनची वारीही करावी लागणार नाही. 

Read More