नागपूर: मराठा समाज अद्यापही आंदोलनावर ठाम आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील विविध ठिकाणी हा समाज रस्त्यावर येत आंदोलन करताना दिसत आहे. दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही येत्या ९ ऑगस्टला मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. बंदच्या नियोजनासाठी नागपुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली होते.
आंदोलनादरम्यान होणारी हिंसा आणि आत्महत्या थांबाव्यात - मुख्यमंत्री
दरम्यान, 'मराठा आरक्षणासंदर्भात नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वेळ पडली तर विशेष अधिवेशन बोलवू, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मराठा आरक्षणासाठीच्या होणाऱ्या आत्महत्या आणि हिंसा थांबायला हव्या. त्यामुळे महाराष्ट्राचं चुकीचं चित्र जातंय, अशी विनंती मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाला करतोय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
धनगर आरक्षणावरही चर्चा - जानकर
दरम्यान, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासह सह धनगर आणि इतर समाज्याच्या आरक्षणाबाबतही चर्चा होणार आहे. मराठा आणि धनगर समाज्यातील युवकांनी जरा धिर धरावा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलु नये असे अवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी शिर्डीत बोलतांना केलय.
मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन
Updated: Aug 06, 2018, 08:28 AM IST
सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.