Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरु आहे. राज्यपाल अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सही करत नाहीत. तर, भाजप आमदार न्यायालयात गेले आहेत. विधानसभेला गत वर्षभरापासून अध्यक्ष नाही. अध्यक्ष मिळाल्याने भाजपचा कोणता तोटा होणार आहे? असा सवाल करतानाच राजकारण कोणत्या थरावरचं करावं हे भाजपला कळत नाही अशी टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी नागपूमध्ये "गोवा तो बस झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है," असं म्हटलं. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते 'मी पुन्हा येणार" असे म्हणायचे. त्यावेळी 'त्यांनी आरशासमोर उभ राहावं. त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल' असं मी म्हटलं होतं. आज ते विरोधी पक्षनेते आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपची कार्यपद्धती आणि तत्त्वज्ञान हे देशहिताचं नाही. म्हणून भाजप सत्तेत न येणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणाले.

Read More