Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शक्तिपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावरील लढाई; 1 जुलै रोजी 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको करणार

शक्तिपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावरील लढाई; 1 जुलै रोजी 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको करणार

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक झालीये..1 जुलैला कृषिदिनाचे औचित्य साधून शक्तिपीठ बाधित 12 जिल्ह्यांत रास्ता रोको करण्याचा आणि जमिनीची मोजणी हाणून पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच  जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवर तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासह सत्यागृह करण्याच्या विषयावर चर्चा झाली. पण, सरकार सत्यागृह, उपोषणासारख्या शांततामय मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेत नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आक्रमक आंदोलनाला पर्याय नाही, या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाल्यामुळे एक जुलै रोजी कृषिदिनाचे औचित्य साधून शक्तिपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यांत रास्ता रोको आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.

 

Read More