Vanchit Bahujan Aghadi On Jitendra Awhad : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटरवरून राष्ट्रवादी शरद पवार पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करण्यात आले होते. यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता. मात्र, कोणत्या कारणामुळे त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर संताप व्यक्त केला होता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
30 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, जितेंद्र आव्हाड, तुमच्या तोंडातून "बाळासाहेब आंबेडकर" हे नाव का उच्चारले जात नाही? आंबेडकर या नावाची अॅलर्जी आहे का? असा सवाल करण्यात आला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटरवरून हे ट्विट करण्यात आले होते. यानंतर अनेकजणांनी हे अकाऊंट हॅक झाल्याचे म्हटलं होतं. परंतु, असं काही न होता हे ट्विट त्यांनीच केल्याच समोर आलं. यानंतर राजकीय वर्तुळातून देखील यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. यावर रोहित पवार यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले रोहित पवार? पाहूयात.
वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या ट्विटवर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेले योगदान महत्वाचे असून न्यायालयीन लढ्यातली त्यांची भूमिकाही अतुलनीय आहे. संविधानविरोधी विचारधारांना लोळवण्याच्या लढाईत आंबेडकर कुटुंब नेहमीच सर्वांना मार्गदर्शक राहिले असून या कुटुंबाबद्दल एक वेगळाच आदर आहे.
काल वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेबांबद्दल वापरली गेलेली भाषा मात्र समर्थनीय नाही आणि ॲड. प्रकाश आंबेडकर साहेबांना तसेच सुजात आंबेडकर जी यांना देखील ती भाषा पटणार नाही. या भाषेचा आम्ही निषेध करतो. सुजात जी आपण अशाप्रकारे ट्विट करणाऱ्या व्यक्तीला समज द्याल, ही अपेक्षा! असं ट्विट त्यांनी केलं.
"@Awhadspeaks, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या!"
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 30, 2025
जितेंद्र आव्हाड, तुमच्या तोंडातून "बाळासाहेब आंबेडकर" हे नाव का उच्चारले जात नाही? आंबेडकर या नावाची अॅलर्जी आहे का?
बाळासाहेब आंबेडकर यांनीच सर्वप्रथम सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमागे पोलिसांचा हात आहे, हे उघड केलं.… https://t.co/l5x6wXvNsg
वंचित बहुजन आघाडीने केलेल्या ट्विटवर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यांच्या ट्विटला सुजात आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रिय रोहित दादा हे ट्विट पक्षात अनेकांना आवडलेले नाही. पक्षांतर्गत याची दखल घेतली जाईलच.
पण, या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की, आंबेडकरवादी चळवळीचे यश हायजॅक करणे आणि त्यावर सरंजामवाद्यांनी राजकीय भाकर भाजणे हे किती काळ सहन करावे?
गेल्या अनेक वर्षाच्या आंबेडकरी चळवळीत बहुजनांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे आणि बहुजन आंबेडकरवादी भूमिका घेऊन उभे राहतात, हे आमचे यश आहे. तुमचे नेते राहुल गांधी हे परभणीला येतात आणि सोमनाथ सुर्यवंशीला दलित म्हणतात आणि आंबेडकरवादी चळवळीतील बहुजनांचा सहभाग पुसून काढतात.
आंबेडकरवादी चळवळीने सोमनाथ सुर्यवंशीसाठी मोठा लढा उभा केला. बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद खंडपीठात, सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्याहून महत्त्वाचे शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईला फडणवीस सरकारने, पोलिसांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आमिष दाखवले पण, त्या कशालाही जुमानल्या नाहीत.
@NCPspeaks @INCIndia यांचा क्रेडिट घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार नाही का? आज हा राग एका ट्विटमधून व्यक्त झालाय. सरंजामवाद्यांची हीच भूमिका राहिली तर लोकांचा रोष याहून तीव्र होईल. जितेंद्र आव्हाड स्वतःची वाह वाह करणे ही शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईच्या संघर्षाचा आणि वंचितांच्या लढ्याचा अपमान आहे. आव्हाड यांची ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का ? हीच तुमची आंबेडकरी चळवळीबाबत पक्षाची पॉलिसी आहे का?
प्रिय @RRPSpeaks दादा
— Sujat Ambedkar (@Sujat_Ambedkar) July 31, 2025
हे ट्विट पक्षात अनेकांना आवडलेले नाही. पक्षांतर्गत याची दखल घेतली जाईलच.
पण, या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की, आंबेडकरवादी चळवळीचे यश हायजॅक करणे आणि त्यावर सरंजामवाद्यांनी राजकीय भाकर भाजणे हे किती काळ सहन करावे?
गेल्या अनेक वर्षाच्या आंबेडकरी… https://t.co/ZBSdZWjBpe