Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ


अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाल्याचा झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रोहित पवारांचा दावा. आरोप झाल्यास पक्षातील किती प्रमुख नेते दादांची बाजू घेणार असा रोहित पवारांचा सवाल आहे. 

  राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

Rohit Pawar  To The Point Interview : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 3 गट सक्रिय असल्याची चर्चा रोहित पवार यांच्या दाव्यामुळे रंगली आहे. 

राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि राष्ट्रावादीचे दोन गट झाले. शरद पवारांची राष्ट्रावादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट राज्याच्या सत्तेत सहभागी झाला. तर, शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आता मात्र, राज्यात राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट असल्याची चर्चा रंगली आहे.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी याबाबत खळबळजनक दावा केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखती रोहित पवार यांनी हा मोठा दावा केला. 

दादांच्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत असं विधान रोहित पवार यांनी केले आहे. अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातील किती प्रमुख नेते दादांची बाजू घेतात? असा सवाल रोहित यांनी उपस्थित केला. अजित पवारांच्या राष्ट्रावादीतील कोकणातील नेते स्वत:ला बॉस समजतात असं म्हणत रोहित पवार यांनी सुनिल तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.  तर दुसरीकडे तटकरेंवर पत्ते फेकल्यावर काहीजण मारहाण करतात असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील गटबाजीवर भाष्य केले.

झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मोठं विधान केले. येत्या काही महिन्यात धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना तर घड्याळ हे चिन्ह शरद पवारांना मिळणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचा दावा देखील रोहित पवारांकडून करण्यात आलाय. शिंदेंच्या घरी आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप देखील रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.

हे देखील वाचा....

 123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलेले महाराष्ट्रातील एकमेव शहर; पवारांच्या घरची सून या शहराच्या संस्थापकाची मुलगी

 

महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध IT पार्क उभे राहिले; रातोरात कोट्यावधीची उलाढाल आणि...

 

Read More