Sunil Tatkare On Rohit Pawar : झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये व्यक्ती कोणीही असू दे, त्यांची चर्चा राज्य पातळीवर नेहमीच होते. त्याचाच अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची टू द पॉईंट मुलाखत झाली. यावेळी रोहित पवारांनी केलेल्या दाव्यांची राज्य पातळीवर चर्चा झाली. रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक मोठा दावा केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झालेत, असं विधान रोहित पवार यांनी केले. अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातले किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे तटकरेंवर पत्ते फेकल्यावर काहीजण मारहाण करतात, असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या गटबाजीवर भाष्य केलंय. तसंच सुनील तटकरे 2029ची निवडणूक भाजपमधून लढणार असा गौप्यस्फोट देखील रोहित पवारांकडून करण्यात आलाय.
रोहित पवारांच्या दाव्यानंतर सुनील तटकरेंनी देखील रोहित पवारांबाबत एक धक्कादायक विधान केलंय. रोहित पवार 2019च्या विधानसभेत भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मोठं विधान केले. येत्या काही महिन्यात धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना तर घड्याळ चिन्ह शरद पवारांना मिळणार, असा मोठा दावा त्यांनी केला. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. शिंदेंच्या घरी आयकर विभागाची नोटीस पाठवल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला. तर रोहित पवारांच्या दाव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये व्यक्ती कोणीही असू दे, त्यांची चर्चा राज्य पातळीवर नेहमीच होते. त्याचाच अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची टू द पॉईंट मुलाखत झाली. यावेळी रोहित पवारांनी केलेल्या दाव्यांची राज्य पातळीवर चर्चा झाली.