Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चोराला आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलने पकडलं

ओळख लपवण्यासाठी टीशर्ट ही बदलला

चोराला आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलने पकडलं

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकात एका अट्टल चोराला आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली. पळता पळताच चोराने ओळख लपवण्यासाठी आपला टी शर्टही बदलला. मात्र आरपीएफ जवानांनी शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. पुणे हातिया या गाडीतून हा चोर उतरला. लाल शर्ट घातलेल्या राजेश पांडे या तरूणाचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला हटकला. मात्र उडवाउडवीची उत्तरं देऊन तो पळायला लागला. 

आरपीएफ जावान संजय खंडारे यांनी सहकाऱ्यांसह त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान आरोपी प्रतिक्षालयात शिरला. तिथे त्याने टी शर्ट बदलला. डोक्यावरची टोपीही काढली. मात्र आरपीएफ जवानांनी त्याला हेरलं आणि शिताफीने पकडला. राजेश पांडे नावाच्या या चोराकडून पोलिसांनी 7 मोबाईल जप्त केले आहेत.

Read More