Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

समाजात कोणताही भेदभाव असू नये - भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरेगाव भीमा प्रकरण आपले मत केले व्यक्त. 

समाजात कोणताही भेदभाव असू नये - भागवत

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरेगाव भीमा प्रकरण आपले मत केले व्यक्त. 

भारत केवळ भूमी नसून ती भारतमाता आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात भारतमातेविषयी भक्ती ठासून भरलेली असते असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलंय. भीमा कोरेगाव वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांच्या या विधानाकडे पाहिलं जातंय. उज्जैनमध्ये भारतमाता मंदिराच्या उदघाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते. समाजात कोणताही भेदभाव असू नये असं मतही भागवत यांनी व्यक्त केलंय. 

महाराष्ट्र बंद म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाला विरोध केला आहे. ज्या-ज्या ठिकाणी काल दलित समाजाने आंदोलन, रास्तारोको केला त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार्‍या घोषणा दिल्या जात होत्या. कोरेगाव - भीमा घटनेमुळे दलित समाजात प्रचंड अस्वस्थता आणि राग होता. मात्र याबाबत रामदास आठवले, गवई गट, आनंदराज आंबेडकर अथवा इतर कुठल्याही दलित नेत्याने कोणताही ठोस भूमिका घेतली नाही. 

Read More