Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबावर रक्षाबंधनाच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भावाचे अचानक निधन झाले असून या घटनेमुळे रक्षाबंधनाचा आनंद शोकात परिवर्तित झाला.
आपल्या भावाच्या निधनाची बातमी रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली. त्या म्हणाल्या की, 'बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा. असं कसं न सांगता निघून गेला. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू.
रुपाली चाकणकर यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच पक्षातील सहकारी, मित्रपरिवार आणि चाहत्यांनीही त्यांच्या दुःखात सहभागी होत भावाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भावामध्ये घट्ट जिव्हाळ्याचं नातं असल्याचे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होतं. रक्षाबंधनासारख्या भावंडांच्या प्रेमाचा सण असताना आलेल्या या दुःखद बातमीमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
रुपाली चाकणकरांच्या भावाचे नाव बाळराजे माळी असून त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं रक्षाबंधनाच्या दिवशी निधन झालं. बाळराजे माळी हे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी यांचे सुपुत्र होते. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी बाळराजेंचं निधन झाल्याने कुटुंबिय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
बाळराजे हे रुपाली चाकणकर यांचा लाडका मावस भाऊ होता. रक्षाबंधनाच्या दिवशीच त्यांची ही बातमी ऐकून त्यांना देखील एक मोठा धक्का बसला. रक्षाबंधन आणि त्याच दिवशी लाडक्या मावस भावाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
FAQ
बाळराजे माळी कोण होते?
बाळराजे माळी हे रुपाली चाकणकर यांचे लाडके मावस भाऊ होते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी यांचे सुपुत्र होते.
बाळराजे माळी यांचे निधन कसे झाले?
बाळराजे माळी यांचे रक्षाबंधनाच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रुपाली चाकणकर यांनी निधनाबद्दल काय म्हटले?
रुपाली यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून सांगितले की, बाळराजे यांचे अचानक निघून जाणे वेदनादायक आहे आणि त्यांच्यावर श्रद्धांजली कशी वाहू याचीच चिंता आहे.