Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सचिन अंदुरेची कोठडी संपली, पुन्हा न्यायालयात हजर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपी सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आज संपत आहे.

सचिन अंदुरेची कोठडी संपली, पुन्हा न्यायालयात हजर

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपी सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंदुरेला १८ ऑगस्टला औरंगाबादमधून अटक करण्यात आली. याआधी सात आणि चार दिवसांची सीबीआय कोठडी त्याला सुनावण्यात आलीय.

एकत्रित तपासाची मागणी 

डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणारा सचिन अंदुरेच होता असं एटीएसने कोर्टात म्हटलंय. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांचा एकत्रित तपास करायचा आहे.

असं सीबीआयने याआधी कोठडीची मागणी करताना कोर्टाला सांगितलं होतं. मात्र शरद कळसकरचा ताबा सीबीआयला मिळालेला नाही. 

Read More