Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Saif Ali Khan Attacked: मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत, तरी अशी अवस्था का? वर्षा गायकवाडांचा सवाल

Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  

Saif Ali Khan Attacked: मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत, तरी अशी अवस्था का? वर्षा गायकवाडांचा सवाल

Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मात्र, अभिनेत्याच्या घरात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सुरक्षा असतानाही सैफ अली खानवर हल्ला झाल्याने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकू हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला असून लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफ अलीखानवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गृहमंत्र्यांनी जबाबदारी घ्यायला हवी, हे यंत्रणेचे अपयश आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, 'सैफ अली खानवर चाकूहल्ला झाला आहे. ज्यांच्याकडे सुरक्षा आहे ते देखील सुरक्षित नाहीत. तर सर्वसामान्यांचे काय. याआधी सलमान खानच्या घरासमोर गोळीबार, बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या आणि आता सैफ अली खानवर हल्ला, जे जे हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार, बीड, परभणीतही काय चाललंय हे आपण बघतोय. हे राज्यात काय चाललं आहे. मुंबईचे पोलिसांची तुलना ही स्कॉटलँड पोलिसांसोबत होते. मग पोलिसांची अशी अवस्था का झाली. त्यांना स्वातंत्र्य नाही, त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते, त्यांच्या बायकांबद्दल बोलले जाते. गृहमंत्र्यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल. पोलिस आयुक्त व संचालक कुठे आहेत. हे यंत्रणेचे अपयश आहे,' असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

'वर्दळीच्या वस्तीतदेखील अशा घटना होत आहेत. ज्यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था आहे. त्यांच्यावरही अशा प्रकारचे हल्ले होत आहेत तर सर्वसामान्यांच्ये काय?', असा सवाल त्यांनी केला आहे. लोकांना बंदुकी, चाकू या वस्तु कुठून मिळायला लागल्या आहेत. लोक घरात सुरक्षित नाहीत. आता तर लोक घरात घुसायला लागलेत. पोलिसांचे वर्चस्व कमी झाले आहे. पोलिसांचा दरारा कमी झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

'मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे बॉलिवूडचे अनेक कलाकार राहतात तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवू शकत नाही. कायदा सुव्यवस्थाबद्दल चर्चा होते पण कारवाई कुठे होते. पोलिसांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. पोलिस यंत्रणेचे खच्चीकरण थांबवले पाहिजे. गृहमंत्रालयाने आता बोललं पाहिजे,' असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

Read More