Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अरबाजच्या सट्टेबाजीला वैतागले होते सलमान आणि मलाइका

...म्हणून अरबाजवर वैतागले होते सलमान आणि मलाईका

अरबाजच्या सट्टेबाजीला वैतागले होते सलमान आणि मलाइका

ठाणे : आयपीएल सट्टेबाजी प्रकरणानं नवनवे खुलासे होत आहेत. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाला सट्टेबाजीच कारणीभूत असल्याचे समोर आलं. अरबाजच्या सट्टेबाजीमुळे मलायका अरोरा आणि त्याचा भाऊ अभिनेता सलमान खानही वैतागले होते. सट्टेबाजांचे रक्कमेच्या वसुलीसाठी मलायकाला धमकीचे फोन येत होते. यावरुन दोघांमध्ये वादही व्हायचे. अखेर याच सट्टेबाजीला वैतागून मलायकाने अरबाज खानशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. 

सट्टेबाजीप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं अरबाजला समन्स बजावला होता. तीन दिवसांपूर्वी सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान याला ठाणे गुन्हे शाखेनं आयपीएलवर सट्टा लावल्याप्रकरणी अटक केली होती. सोनूच्या चौकशीत सट्टेबाज आणि बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. अरबाजसोबतच याप्रकरणी निर्माता पराग संघवी याचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अजून तीन चित्रपट निर्माते पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे.

Read More