Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अखेर फलकावरील सावित्रीबाईंच्या नावापुढील ''साध्वी'' उल्लेख हटवला

 पुण्यात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ उद्यान आहे. या उद्यानाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं. त्यांच्या नावाआधी साध्वी असा उल्लेख करण्यात आला होता.    

अखेर फलकावरील सावित्रीबाईंच्या नावापुढील ''साध्वी'' उल्लेख हटवला

पुणे : महापुरुषांची नावं आपण आदराने घेतो.  पुण्यात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ उद्यान आहे. या उद्यानाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं. त्यांच्या नावाआधी साध्वी असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र या सर्व प्रकरणावरुन तीव्र निषेध नोंदवण्यात आला. नेटीझन्सनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात नाराजी व्यक्त केली. यानंतर आता समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत उद्यानाला देण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या नावापुढील साध्वी हा उल्लेख झाकला आहे.

आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण करण्यात आल्याने समाजातील अनेकांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शहरातील ढोले पाटील कार्यालयाजवळ असलेल्या या उद्यानाला नाव दिलं गेलं. या नावापुढे साध्वी असा उल्लेख जोडण्यात आला. समाजातील आदर्श व्यक्तींना एखाद्या धर्मापुरतं किंवा एखाद्या समाजापुरतं मर्यादित हे योग्य नाही, असंही काही सामजिक कार्यकर्त्यांचं म्हणंन होतं. त्यामुळे अखेर या विरोधानंतर तो वादग्रस्त उल्लेख झाकण्यात आला आहे. 

Read More