Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिवराज्याभिषेक सोहळा रद्द करा; संभाजी भिडेंची वादग्रस्त मागणी आणि पुन्हा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख

संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 6जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा रद्द करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सोहळे तिथी प्रमाणे साजरे करा अशी मागणी त्यांनी केली आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्य़ासही त्यांनी विरोध केला आहे. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास  संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत हे तपासावं आणि याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधन मंडळ स्थापन करुन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा रद्द करा; संभाजी भिडेंची वादग्रस्त मागणी आणि पुन्हा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख

Sambhaji Bhide On Shivrajyabhishek : संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 6जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा रद्द करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सोहळे तिथी प्रमाणे साजरे करा अशी मागणी त्यांनी केली आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्य़ासही त्यांनी विरोध केला आहे. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास  संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत हे तपासावं आणि याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधन मंडळ स्थापन करुन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजी भिडे बोलले आणि वाद झाला नाही असं होत नाही. यावेळीही संभाजी भिडेंनी नवा वाद ओढवून घेतलाय. किल्ले रायगडावरच्या 6 जूनच्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याला संभाजी भिडेंनी विरोध केलाय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं राजकीयकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

शिवराज्याभिषेक हा तिथीप्रमाणं व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.  शिवराज्याभिषेक साजरा करण्यावरुन वाद होऊ नये अशी अपेक्षा सरकारनं व्यक्त केलीय. संभाजी भिडेंच्या मागणीबाबत मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील असं आश्वासनही सरकारकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी दिले आहे. 

संभाजी भिडे फक्त शिवराज्याभिषेकाच्या मुद्यावरच बोलून थांबले नाहीत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही आपलं मत मांडलं. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशावेळी संभाजी भिडेंनी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेवरुन साजरा करण्याला विरोध केलाय. संभाजी भिडेंनी केलेलं वक्तव्य हे अचूक टायमिंग साधून केलंय. पण या वक्तव्यानं सरकारची मात्र अडचण झाली आहे. 

Read More