Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

3500000000... महाराष्ट्रात पुन्हा Torres Company सारखा मोठा घोटाळा; गुजरातच्या कंपनीचा 800 लोकांना गंडा

गुजरातच्या कंपनीने संभाजीनगरच्या 800 गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा घातला आहे. विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. 

3500000000... महाराष्ट्रात पुन्हा Torres Company सारखा मोठा घोटाळा; गुजरातच्या कंपनीचा 800 लोकांना गंडा

Sambhaji Nagar Crime News :  महाराष्ट्रात पुन्हा Torres Company सारखा मोठा घोटाळा झाला आहे.  मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिश दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Torres Company Scam). यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकराणाचा तपास पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्रात असाच नवा घोटाळा उघडकीस आला आहे. 35 कोटींचा हा घोटाळा आहे.  गुजरातच्या कंपनीने महाराष्ट्रात तब्बल 800 लोकांना गंडा घातला आहे. 

हे देखील वाचा... दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा

मुंबईत टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना घातलेल्या गंडाचं प्रकरण अद्यापही ताजं आहे. त्यातच संभाजीनगरमध्येही असाच एका कंपनीची भामटेगिरी समोर आलीय. संभाजीनगरमध्ये क्विक स्टार्ट  या कंपनीने जिल्ह्यातील तब्बल 800 च्या वर नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. 2023 पासुन हा सगळा प्रकार सुरू होता. गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत कंपनीने हा गंडा घातलाय.  धक्कादायक म्हणजे एकट्या संभाजीनगरात 3 कार्यालयांमधून या कंपनीचा गोरखधंदा सुरू होता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर 3 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट 24 ग्रुप कंपनीने 800 वर गुंतवणूकदारांकडून 35 कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आले आहे.

या कंपनीने एका वर्षासाठी एक लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून गुंतवणूकदाराना 35 कोटी रुपयांचा गंडा घातला. धक्कादायक म्हणजे ज्यांनी यात गुंतवणुक केली त्यांचे डॉक्युमेंट्स थेट गुजरातमधून नोटरी करून घेतले जात होते... या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनी संचालक हर्षल गांधी आणि प्रतीक शाह फरार आहेत तर स्थानिक व्यवस्थापकांना पोलिसांनी अटक केलीय.

Read More