Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अपहरण, अफवा आणि मारहाण! संभाजीनगरात का निर्माण केलं जातंय संशयाचं वातावरण?

Sambhajinagar Crime: संभाजीनगर शहरात लहान मुलांचं अपरहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरलीय.

अपहरण, अफवा आणि मारहाण! संभाजीनगरात का निर्माण केलं जातंय संशयाचं वातावरण?

Sambhajinagar Crime: गेल्या आठवड्यात दोन कोटीच्या खंडणीसाठी संभाजीनगरमध्ये सात वर्षाच्या मुलाचे अपहरण झालं होतं. त्यानंतर आता तर शहरात लहान मुलांचं अपरहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरलीय. त्यातून दोघांना नागरिकांना बेदम मारहाण केलीय. काय आहे हा प्रकार? सविस्तर माहिती करुन घेऊया.

अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका

संभाजीनगरमध्ये सध्या अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. गेल्या आठवड्यात संभाजीनगरच्या चैतन्य नावाच्या एका सात वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं दोन कोटींच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं. मात्र पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका केली.  मात्र तेव्हापासून संभाजीनगरमधील नागरिक प्रचंड धास्तावलेत. 

दोन चोरांना बेदम मारहाण 

त्यानंतर समाजमाध्यमावर मुलांचं अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवांचं पेव पसरलंय. त्यातून संभाजीनगरच्या  सईदा कॉलनीत दोन चोरांना बेदम मारहाण करण्यात आलीय. वेळीच पोलीस घटनास्थळी आल्यानं दोघा चोरट्यांचा जीव वाचलाय.त्यामुळे आता पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नागरिकांना केलंय.

मुलीकडून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

याच अपहरणाचा चर्चांचा आधार घेत एका मुलीने कहरच केला. तिने थेट स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला. तो ही आई वडील शिक्षक रागावू नये म्हणून.एकीकडे नागरिकांमध्ये मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरल्या आहेत तर दुसरीकडे काही तरुण याचा आधार घेत संशयाचं वातावरण निर्माण करताहेत. त्यामुळे तुमच्यापर्यंतही अशी अफवा अली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा येवढचं या निमित्तानं सांगणं.

Read More