Samruddhi Mahamarg Latest Updates: मुंबई नागपूर रस्ताने प्रवास प्रथम नाहीसा वाटायचा कारण हा प्रवास 17 ते 18 तास होता. तर ट्रेनने हा प्रवास 12 तासांचा आहे, आणि आता हा प्रवास महामार्गाने सुसाट झाला आहे. कारण समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाचा सुरु झाला आहे. त्यामुळे मुंबई नाशिक 2 तासांवर आला तर मुंबई नागपूरचा प्रवास हा 8 तासांत पोहोचता येणार आहे. राजधानी आणि उपराजधानी जोडणारा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गाबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.
सहापदरी समृद्धी महामार्ग 120 रुंदीचा हा मार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणार आहे. या महामार्गामुळे 10 जिल्हे, 26 तालुके आणि जवळपास 392 गाव जोडली गेली आहे. तर महामार्गा लागून 19 कृषी समृद्धी केंद्रांची आहेत. भविष्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे 11 लाख 31 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
तर या महामार्गाचा वेग ताशी 150 किमी इतका आहे. तर वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी प्रत्येकी पाच किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय तुमची गाडी महामार्गावर प्रवेश केल्यावर वेळ नोंदवली जाईल. पण तुम्ही समृद्धीवरून किती वाजता बाहेर पडलात यांची नोंद घेतली जाते. या नोंदच्यानुसार तुम्ही ताशी किती वेगाने गाडी चालवली याचा अंदाज घेऊन मशिन वेग मर्यादा तोडल्यास तुम्ही पकडल्या जाता.
या महामार्गावर 65 उड्डाणपूल, 33 मोठं पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, 25 इंटरचेंजेस, 6 बोगदे, 189 भूयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 110 भूयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी 209 भूयारी मार्ग, वन्यजीवांसाठी 3 भूयारी मार्ग आणि 3 उन्नत मार्ग आहे.
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग 10 जिल्हे जोडले गेले आहेत. तर या महामार्गामुळे ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद , जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर ही शहरं जोडली गेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी, नाशिक येथे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी–आमणे या अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2025
(गुरुवार, दि. 5 जून 2025)
वेळ: दु. 12.30 वा. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SamruddhiMahamarg pic.twitter.com/a2SUd4lSgB
मुंबईतून पूर्व द्रुतगती मार्ग, मुंब्रा, ठाणे
पूर्व उपगरांतून कल्याण आणि डोंबिवलीजवळून
नाशिक जवळ, शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा
जालना जवळ, शहर आणि आसपासच्या क्षेत्रांना जोडणार
संभाजीनगरजवळ शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणार
नागपूरच्या वाहतूक जालाशी समाकलित
अकोला शहर आणि आसपासच्या क्षेत्रांना जोडणार
तसंच भिवंडी, कल्याण, इगतपुरी, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, लेणी, मेहकर, धामणगाव, बुट्टोबोरी पॉवर प्लांट
मुंबई - नागपूर महामार्गावर 31 टोलनाके असून नागपूर - शिर्डी दरम्यान 18 टोलनाके आहेत. वायफळ, सेलहोड वडगाव बक्षी, येळकेली, विरुल, धामणगाव, गावनेर तळेगाव, कारंजा लाड, शेलू बाजार, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव - जांबरगाव, कोकमठान याठिकाणी टोलनाके आहेत.
चारचारी वाहने (कार, जीप, व्हॅन) - 1440 रुपये
हलकी, व्यावसायिक, मिनी बस - 2075 रूपये
बस किंवा ट्रकसाठी - 3655 रुपये
अति अवजड वाहनांसाठी - 6980 रुपये