Sangali News Today: पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात बुडालेल्या पतीचादेखील मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीने प्राण सोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या आळसंदमध्ये पत्नीच्या मृत्यूच्या विरहाने पतीचादेखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता थोरात आणि धनाजी थोरात असे पती-पत्नीची नावे आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पती धनाजी थोरात यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी सुनीता थोरात यांचे अल्पशा आजाराने निधन झालं होतं, पत्नीच्या अकाली जाण्याचा धक्का पती थोरात यांना सहन झाला नाही. यातुन त्यांना हृदविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, सहा ऑगस्ट रोजी सुनीता थोरात यांचा रक्षाविसर्जन पार पडणार होते. नेमकं त्याच दिवशी उपचार सुरू असलेल्या धनाजी थोरात यांनी आपले प्राण सोडले. अवघ्या दोन ते तीन दिवसाच्या अंतरात पती-पत्नीच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे मात्र आळसंद गावात शोककळा पसरली आहे.
63 वर्षीय वर्षा जोशी या निवृत्त शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रावतळे परिसरातील घरात वृद्ध शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. महिलेच्या अंगावर अनेख जखमादेखील आढळल्या आहेत. चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घरातील CCTV कॅमेराची हार्ड डिस्क देखील गायब असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
पत्नी सुनीता थोरात यांच्या मृत्यूनंतर पती धनाजी थोरात यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
पत्नीच्या मृत्यूच्या विरहाने धनाजी थोरात यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुनीता थोरात यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले.