Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

सांगली : सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुयोग औंधकर असं या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. दहा लाख रुपयांची खंडणी घेताना औंधकर आणि कृष्णा जंगम यांना अटक करण्यात आली. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा या दोघांवर आरोप आहे.

इस्लामपूरमध्ये संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकरनं सहकार विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रार केली होती. तक्रार मागे घेण्यासाठी सुयोगनं १० लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी इस्लामपूरचा संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर आणि त्याचा सहकारी कृष्णा जंगम याला पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. 

Read More