Sangli ST Bus Accident : महाराष्ट्रात एक थरारक अपघात झाला आहे. सांगलीत एक ST बस विहीरीच्या कठड्यावर जाऊन अडकली. नशिब बलवत्तर म्हणून विहीरच्या कठड्यावर जाऊन एसटी थांबली. 31 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. या अपघाताचा फोटो सोशल मिडियावर व्हयारल झाला आहे.
सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे एसटी बसला अपघात झाला आहे. सुदैवाने बस विहिरी मध्ये कोसळता- कोसळता राहिली. अगदी कठड्यावर जाऊन एसटी बस थांबल्याने मोठे दुर्घटना टाळली आहे.
एसटी बस अपघातामध्ये 17 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 31 प्रवाशांना घेऊन पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड-तासगाव ही एसटी निघाली होती. तासगावच्या अलीकडेच असणाऱ्या येळावी येथे अचानकपणे एक दुचाकीस्वार एसटीच्या समोर आला. यामुळे एसटी ड्रायव्हर गोंधळला. एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीच्या दिशेने गेली.
बस विहीरीच्या कठड्यावर धडकणार होती. यावेळेस बसचे मागील चाक रस्त्याच्याकडेल असणाऱ्या चरित अडकल्याने समोर पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कठड्यावर जाऊन एसटी बस थांबली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र यामध्ये चालकासह 17 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे.
साताऱ्यातील वाढे फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर भला मोठा जीवघेणा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे टायर फुटत असल्याचे आणि त्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे वृत्त झी 24 तास ने दाखवले होते.या बातमी ची तत्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी हा भला मोठ्ठा खड्डा अखेर मुजवला आहे.या मुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.