Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप...'; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेनंतर संजय राऊत म्हणाले, 'हा माणूस महाराष्ट्र...'

Sanjay Raut on Eknath Shinde : महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. 

'अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप...'; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेनंतर संजय राऊत म्हणाले, 'हा माणूस महाराष्ट्र...'

Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी हा वाद पेटला आहे. शालेय अभ्यासात त्रिभाषा सूत्राबद्दल राज्य सरकारने दोन जीआर काढले होते. पण याविरोधात कायम विरोधात असलेले दोन भाव राज्य सरकारविरोधात एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारला त्रिभाषा सूत्राबद्दलचा जीआर मागे घ्यावा लागला. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषा असं सूत्र असावं, असं विरोधकांनी निश्चिय केला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रसह जय गुजरात अशी घोषणा केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. 

'अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप...'

उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया साइट xवरुन अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप आज बाहेर आलं आहे, असं म्हटलं आहे. त्यांनी यात म्हटलं आहे की, पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली!
काय करायचे?
ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा 
हजार माराव्या आणि एक मोजाव्या 
हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? 

असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर ही पोस्ट करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे. 
राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क जय गुजरातची घोषणा केली. पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, अमित शाह यांचं कौतूक करताना एकनाथ शिंदेंनी अनेक विशेषणं आणि उपमांचा वापर करत होते. मात्र, यंदा भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी  'जय हिंद, जय महाराष्ट्र', जय गुजरात अशी घोषणा केली.  त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा नवीन विषय मिळालाय.

Read More